Parents Tips : मुलांच्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात! त्यांना हवी असू शकते तुमची मदत!
मुले शब्दांपेक्षा कृतीतून आपल्या भावना अधिक व्यक्त करतात. जर आपण त्यांना समजून घेतले नाही तर ते आणखी चिडचिडे होऊ शकतात. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेव्हा मुलाला आपली गरज वाटते आणि तो या भावनेला शब्द देऊ शकत नाही, तेव्हा तो आपल्या वागण्यातून व्यक्त करतो. त्यांना समजून घ्यायला हवं. (Photo Credit : pexels )
मुले वारंवार आग्रह धरतात की तुम्ही त्यांच्याबरोबर सर्व खेळ खेळा. लूडो, कॅरम, चेस, लेगोस, बिल्डिंग ब्लॉक्स बनवा आणि त्यांना विजेते बनताना पहा आणि त्यांचा उत्साह वाढवा. यामुळे त्यांना अधिक अभिमान वाटतो आणि आपण त्यांच्याशी अधिक कनेक्टेड राहतो.(Photo Credit : pexels )
तुम्ही लॅपटॉप चालवत असाल, स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असाल किंवा घराची साफसफाई करत असाल, तुमच्या प्रत्येक कामात मुलांना तुमची मदत करायची असते. त्यांच्या सहकार्याने तुमचे काम वाढले तरी ते आपल्या मुद्द्यावर ठाम राहतात. तुमच्यासोबत काम केल्याने त्यांना तुमच्या आयुष्यात त्यांचं महत्त्व वाढलेलं दिसतं आणि या भावनेने ते तुमच्याशी आणखी जोडलेले वाटतात आणि आनंदी होतात.(Photo Credit : pexels )
कधी कधी मुलांना काय हवंय ते समजत नाही, पण प्रत्यक्षात ते तुमच्याकडून आणखी कनेक्शनची मागणी करत असतात , तेव्हा ते रडायला लागतात . तेव्हा त्यांच्या रडण्याचं स्पष्ट कारण नसेल तर मुलांना मिठी मारून गप्प करा.(Photo Credit : pexels )
प्रत्येक छोट्या-छोट्या यशाच्या वेळी आपण त्यांना पहावे अशी त्यांची इच्छा असते. यामुळे त्यांना अधिकच कुतूहल, प्रेरणा आणि आनंद वाटतो. ते खेळत असतात , नृत्य करत असतात किंवा साधे बिल्डिंग ब्लॉक तयार करत असतात पण त्यावेळी त्यांच्या पालकांनी त्यांना पहावे आणि त्यांचे कौतुक करावे अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे त्यांचे संकेत समजून घ्या आणि आपण त्यांच्याबरोबर आहात याची त्यांना जाणीव करून द्या आणि अशा प्रकारे त्यांना प्रेरित करा.(Photo Credit : pexels )
मूल विनाकारण आक्रमक वृत्ती अवलंबत असेल, रागावत असेल किंवा प्रत्येक टप्प्यावर ओरडत असेल तर सावध राहा आणि मुलांची विशेष काळजी घ्या तसेच त्यांना पुरेसा वेळ द्या. (Photo Credit : pexels )
जर मुलांना आपल्या पालकांना मिठी मारायची असेल किंवा आपल्या पालकांच्या आजूबाजूला राहायचे असेल तर समजून घ्या की ते त्यांच्या पालकांकडून अधिक कनेक्शनची मागणी करीत आहेत.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )