Mobile Phone : तुम्ही रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता? आरोग्याला होतात 'हे' दुष्परिणाम..
रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवयआरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री अंधारात तासंतास मोबाईल स्क्रीन पाहिल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. (Photo Credit : unsplash)
सतत मोबाईलमध्ये पाहिल्यास डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. तसेच रेटिनावर मोठ्या प्रमाणात ताण येतो. (Photo Credit : unsplash)
रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स येतात, त्यामुळे डोळ्यांची त्वचा खराब होते. (Photo Credit : unsplash)
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते. शरीरातील मेलाटोनिन हॉर्मोन्सची पातळी कमी होते. (Photo Credit : unsplash)
रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन स्क्रोल केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : unsplash)
रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यास मेंदूची क्षमता कमकुवत होते. डोकेदुखीचा त्रास वाढतो. (Photo Credit : unsplash)
रात्री सतत मोबाईल वापरल्यामुळे थकवा आणि ताण वाढतो.नैराश्य येते. तसेच सकाळी नकारात्मकता निर्माण होते. (Photo Credit : unsplash)
सतत मोबाईलमध्ये मान घालून बसल्यामुळे मानदुखीचा त्रास उद्भवतो. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)