Protein : प्रोटीनच्या अतिसेवनाने होतात हे नुकसान! जाणून घ्या दिवसभरात किती प्रोटीन घ्यावे?
आजकाल लोक व्यायाम आणि फिटनेसकडे मोठ्याप्रमाणात लक्ष देत आहेत. यासाठी लोक तासनतास जिममध्ये घाम गाळत असतात. अशा तऱ्हेने स्नायूंचा समूह वाढवण्यासाठी आणि वेगाने वजन कमी करण्यासाठी अनेक जण उच्च प्रथिने युक्त आहाराचा आधार घेतात. परंतु बर्याच लोकांना हे माहित नसते की जास्त प्रथिने घेतल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो . (Photo Credit : Pexel.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिरोगी व्यक्तीला दररोज प्रति किलो शरीराच्या वजनासाठी 0.8 ग्रॅम प्रथिने आवश्यक असतात. उदाहरणार्थ, जर आपले वजन 60 किलो ग्रॅम असेल तर आपण दररोज कमीतकमी 48 ग्रॅम (60 x 0.8) प्रथिने घ्यावीत. (Photo Credit : Pexel.com)
मात्र गर्भधारणेदरम्यान आणि मुलांच्या विकासादरम्यान प्रथिनांची आवश्यकता जास्त असू शकते. परंतु लक्षात ठेवा, जास्त प्रथिने घेतल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Photo Credit : Pexel.com)
जेव्हा आपण जास्त प्रमाणात प्रथिने घेतो तेव्हा आपल्या मूत्रपिंडावर अतिरिक्त दबाव येतो आणि हे दीर्घकाळ चालले तर मूत्रपिंड कमकुवत होण्याची शक्यता असते . (Photo Credit : Pexel.com)
अधिक प्रथिने शरीरात आम्लता वाढवतात, ज्यामुळे हाडांमधून कॅल्शियम बाहेर पडते, यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे कमकुवत होतात. (Photo Credit : Pexel.com)
वजन वाढणे: अशा प्रकारे, जास्त प्रमाणात प्रथिने घेतल्यास वजन वाढू शकते आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. (Photo Credit : Pexel.com)
पचनाच्या समस्या:अतिरिक्त प्रोटीनमुळे पोट फुगणे, अतिसार, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. प्रथिनांचे जास्त सेवन टाळावे. (Photo Credit : Pexel.com)
आपल्या शरीरात प्रथिने फार महत्वाची भूमिका बजावत असतात. मात्र जास्त प्रथिने घेतल्यास आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी तुमच्या दिवसाच्या आहारात फक्त १ ते २ प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता . (Photo Credit : Pexel.com)