Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Summer Cooking Tips : उन्हाळ्यात स्वयंपाक करताना खूप चिडचिड होतेय? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा
उन्हाळ्यात स्वयंपाक करणे खूप कठीण होते. अशा वेळी, आपण काही सोप्या पद्धतींनी स्वयंपाक केला पाहिजे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनेहमी सकाळी हलका नाश्ता तयार करा. विशेषत: तुमच्या घरी लहान मुले असतील तर आरोग्यदायी पदार्थ जसे की मल्टीग्रेन सँडविच, व्हेजिटेबल ऑम्लेट इ.पदार्थ बनवा.
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी अन्न शिजविणे कठीण होते. अशा परिस्थितीत, सकाळी जास्तीत जास्त अन्न तयार करण्याचा प्रयत्न करा. यामुळे, तुम्हाला दुपारी स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवण्याची गरज भासणार नाही.
स्वयंपाकघरात नेहमी एक्झॉस्ट फॅन वापरा. त्यामुळे स्वयंपाकघरातील गरम हवा बाहेर येते. तसेच बाहेरून ताजी हवा मिळू शकते.
जेवण बनवण्याचे सर्वात मोठे काम म्हणजे मेन्यू ठरविणे. म्हणून, स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी, तुमचा मेन्यू ठरवा. यामुळे स्वयंपाक करणे सोपे होईल.
जेवण बनवताना अधून मधून पदार्थ खा. जसे की, ड्रायफ्रूट्स, काकडी, सॅलड, ताक, फळं यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तसेच तुमची ऊर्जाही टिकून राहिल.
नेहमी संध्याकाळी कोल्ड कॉफी किंवा थंडगार सूप तयार करा. हे बनवायलाही खूप सोपे आहे. यासोबतच तुमचे मनही प्रसन्न होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.