Photo: नामांतराच्या समर्थनार्थ मनसेकडून स्वाक्षरी मोहीम

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापले आहे.

Photo: नामांतराच्या समर्थनार्थ मनसेकडून स्वाक्षरी मोहीम

1/9
एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णयाविरोधात साखळी उपोषण सुरू केले आहे.
2/9
तर जलील यांच्या विरोधात आणि छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वाक्षरी अभियान राबविले आहे.
3/9
शहरातील टीव्ही सेंटर येथे हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले.
4/9
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
5/9
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
6/9
यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी करत नामांतराचे समर्थन केले.
7/9
तर जलील यांना औरंगजेबाचे नाव खूपच प्रिय असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावे औरंगजेब ठेवावे, अशी टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.
8/9
मनसेच्या टीकेला जलील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
9/9
कोण मनसे, ज्यांचा एक नगरसेवक नाही त्यांना मी किमंत देत नसल्याचे जलील म्हणाले.
Sponsored Links by Taboola