Strawberry benefits : हिवाळ्यात लालबुंद स्ट्रॉबेरी खाण्याने मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
स्ट्रॉबेरी ही दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे त्याशिवाय पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्यामुळे हाडांसाठी त्या फायदेशीर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्ट्रॉबेरीमध्ये ‘क’ जीवनसत्व मोठ्याप्रमाणात असल्यामुळे दिवसभराच्या कामामुळे येणारा थकवा कमी होतो.
स्ट्रॉबेरीमध्ये सायट्रीक आम्ल आणि आरोग्यास आवश्यक आम्ल मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात अधिक चमकदार होतात. तसेच हिरड्या मजबुत होण्यास मदत होते.
स्ट्रॉबेरीत असणारे अँटीऑक्सीडेंट, फ्लेवोनॉइड, फोलेट आणि केंफेरॉल ही तत्व कॅन्सर होण्यास कारणीभूत असणाऱ्या पेशी नष्ट करतात.
स्ट्रॉबेरी खाल्ल्यानं त्वचा तजेलदार होते, तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात.
स्ट्रॉबेरीमधील ‘फोलेट’ हे तत्व तांबड्या रक्तपेशींची वाढ करण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरीमुळे वजनावर नियंत्रण मिळवण्यास फायदा होतो.
स्ट्रॉबेरीत मँगेनिज हे खनिजद्रव्य आहे त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो, तसेच हाडं दुखण्याचा त्रासही कमी होतो म्हणून थंडीत स्ट्रॉबेरी भरपूर खावी.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.