Japan Banned Ponytails : जपानमध्ये मुलींवर विचित्र निर्बंध, पोनीटेल लैंगिकदृष्ट्या आकर्षित करते?
Japan Banned Ponytails : जपानमध्ये मुलींवर विचित्र निर्बंध लादण्यात आले आहेत. या विचित्र निर्बंधांनंतर जपानमधील शाळा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच जपानमधील शाळांनी मुलींना पोनीटेल बांधण्यास बंदी घातली आहे. मात्र, या निर्बंधापेक्षाही याचे कारण जाणून तुम्हाला अधिक आश्चर्य वाटेल. मुलींनी पोनीटेल बांधल्याने मुले उत्तेजित होऊ शकतात, असं अजब कारण जपानच्या शाळांनी दिलं आहे.
मुलींच्या मानेचा मागचा भाग मुलांना लैंगिक उत्तेजित करू शकतो, असा या बंदीमागचा विचित्र तर्क आहे. त्यामुळेच आता तिथल्या शाळेत शिकणाऱ्या मुली पोनीटेल बांधून शाळेत जाऊ शकत नाहीत.
जपानमधील शाळेत असे विचित्र निर्बंध लादण्याची ही पहिली किंवा नवीन गोष्ट नाही. याआधीही अजब निर्बंध लादले गेले आहेत. 'द न्यू यॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार, येथील अनेक शाळांमध्ये मुलांच्या सॉक्सच्या आकारापासून ते अंतर्वस्त्राच्या रंगापर्यंत विचित्र नियम लागू करण्यात आले आहेत
एका नियमानुसार येथील शाळेत शिकणाऱ्या मुली फक्त पांढऱ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान करून येऊ शकतात. याशिवाय शाळेत कोणतीही मुलगी केस कलर करु शकत नाही.
जपानमधील फुकुओका भागातील 2020 मध्ये अनेक शाळांमध्ये मुलींच्या पोनीटेलच्या नियमाबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार, पोनीटेलमध्ये मुलींची दिसणारी मान पुरुषांना उत्तेजित करते, असे समोर आले.
एकीकडे शाळा असे अजब नियम लादत असताना दुसरीकडे प्रशासन नियम जारी करताना विद्यार्थ्यांना योग्य ते स्पष्टीकरणही देतनाही.