Forehead Tanning: कपाळावरचा काळेपणा दूर करायचाय? घरात ठेवलेल्या या वस्तू वापरा..
अनेक वेळा आपले गाल आणि इतर चेहरा गोरा, स्वच्छ दिसतो परंतु कपाळ त्यांच्यासमोर काळवंडलेले दिसते. टॅनिंगमुळे चेहऱ्याचा आणि कपाळाचा रंग वेगळा दिसतो. काही घरगुती उपायांनी आपण कपाळावरील टॅनिंग सहज साफ करू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहळद हा मसाला कमी आणि औषधी जास्त आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
याच्या सेवनाने कपाळावरील काळेपणा दूर होतो. कच्च्या दुधात हळद मिसळा आणि टॅनिंगच्या भागावर लावा, थोडा वेळ राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा. टॅनिंगची समस्या दूर होईल.
काकडीत अनेक पोषक तत्वे असतात. केवळ खाणेच फायदेशीर नाही, तर काकडीचा वापर ब्युटी प्रोडक्ट म्हणूनही केला जातो.
काकडी लावल्याने टॅनिंग आणि डार्क सर्कलची समस्या दूर होते.
काकडीचे तुकडे करा आणि टॅनिंग भागावर मसाज करा. ३० मिनिटे चेहरा असाच राहू द्या. नंतर पाण्याने धुवा...
बदामाच्या तेलामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
बदामाच्या तेलात दूध पावडर आणि मध मिसळून पेस्ट बनवा. हे लावल्याने कपाळावरील काळेपणा दूर होतो.
बदाम त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचेही काम करते.
कच्चे दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कच्च्या दुधामुळे त्वचेची घाण दूर होते.
कपाळावरचे टॅनिंग दूर करण्यासाठी कच्चे दूध वापरणे फायदेशीर ठरू शकते.कच्च्या दुधात गुलाबजल मिसळून कपाळाला मसाज केल्याने टॅनिंगची समस्या दूर होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही..(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)