Korean Skin Care : कोरियन स्किन केअर टीप्स वापरून पाहा, त्वचा होईन सुंदर
Korean Beauty Tips : कोरियन लोकांची त्वचा आणि सौंदर्य सर्वज्ञात आहे. कोरियन लोकांच्या सौंदर्याबद्दल तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हालाही कोरियन लोकांसारखी तजेलदार आणि सुंदर त्वचा हवी असेल, तर तुम्ही ही कोरियन स्किन रूटीन फॉलो करू शकता. यामुळे तुमचीही त्वचा कोरियन लोकांप्रमाणे डाग रहित होईल.
नॉन फोमिंग क्लीन्सरचा वापर : तुम्ही कोरियन स्किन केअर रूटीन फॉलो करत असाल, तर तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार क्लीन्सर वापरा.
कोरड्या त्वचेसाठी नॉन-फॉर्मिंग क्लीन्सर (Non-Foaming Cleanser) वापरा. केमिकलयुक्त क्लीन्सरऐवजी हायड्रेटिंग घटकांसह बनवलेले क्लीन्सर वापरा.
निस्तेज त्वचेला तजेलदार बनवण्यासाठी आधी त्वचेला हायड्रेट करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही सीरमचाही वापर करु शकता.
तुम्ही चेहऱ्यावर हायल्युरॉनिक ॲसिड, ग्लिसरिन असणाऱ्या सीरमचा तुम्ही वापर करु शकता. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर चेहरा आणि मानेवर सीरम लावा.
मॉइश्चराइजर : त्वचा कोमल आणि मुलायम बनवण्यासाठी चेहऱ्यावर मॉइश्चराइजर वापरा. कोरड्या त्वचेसाठी व्हिटॅमिन सी असलेलं मॉइश्चराइजर वापरा.
सनस्क्रीन : सूर्याची हानिकारक किरणे आणि यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीन वापरायला विसरू नका. घराबाहेर असाल तेव्हा आणि घरात असाल तेव्हाही सनस्क्रीन लावा.
या कोरियन स्किन केअर टीप्स वापरून पाहा. तुमचीही त्वचा सुंदर, कोमल आणि मुलायम होईल.
टीप : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.