Side Effects Of Orange : संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, पण संत्र्यांच्या अतिसेवन ठरतं आरोग्यासाठी घातक
संत्री हे एक उत्कृष्ट सुपर फूड आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. त्याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्याचे शरीराला असंख्य फायदे होतात. याच्या सेवनाने व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंत्री खाल्ल्याने शरीरातील थकवा दूर होतो. तसेच हे फळ शरीराला हायड्रेट ठेवते. लोकांना ही चवीला गोड आणि आंबट संत्री खायला खूप आवडते. संत्र्यांमध्ये भरपूर फायबर असते. जे पचनशक्ती मजबूत करते. संत्री हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पण याचे जेवढे फायदे आहेत तितकेच तोटे देखील आहेत.
जे लोक गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी संत्री खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते अशा लोकांनी जास्त संत्री खाणे टाळावे.
ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी मर्यादित प्रमाणात संत्र्याचे सेवन करावे. संत्र्यामध्ये कूलिंग इफेक्ट असल्याने वेदना आणि सूज येण्याची समस्या वाढू शकते.
किडनीच्या समस्या असणाऱ्यांनी संत्र्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
संत्र्याच्या जास्त सेवनाने छातीत जळजळ होऊ शकते. आंबटपणामुळे त्यात अॅसिडचे प्रमाण आढळून येते ज्यामुळे शरीरातील अॅसिडचे प्रमाण वाढते आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते.
संत्र्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, परंतु जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने अपचन, पोटदुखी आणि जुलाब होऊ शकतात. एका दिवसात जास्तीत जास्त 2 संत्री खावीत.
संत्री हे मुळात आम्लयुक्त फळ आहे. ज्यामुळे संत्र्याचे जास्त सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते.
जास्त संत्री खाल्ल्याने दातांचे नुकसान होऊ शकते. दातांचे संरक्षण करणारा इनॅमल लेयर खराब होऊ शकतो आणि तुम्हाला खाण्यापिण्यात अडचण येऊ शकते.
संत्री खाण्याने अॅलर्जी होऊ शकते. ही अॅलर्जी त्या लोकांना होते. ज्यांनी कधीही संत्री खाल्लेली नाही. संत्र्यामुळे त्वचेवर जळजळ आणि खाज येऊ शकते, यासोबतच काही लोकांची त्वचा लाल होते. याशिवाय संत्र्याच्या सेवनाने व्यक्तीला घशात सूज येते.