Side Effects oF Bottel Gourd : दुधी भोपळा आरोग्यदायी असला तरी, त्याचेही होतात साईड इफेक्ट; जाणून घ्या
दुधी भोपळा हा शरीराकरता मोठ्या प्रमाणात चांगला मानला जातो. याच्या सेवनाने शरीर सुदृढ राहण्यास मोठी मदत होते. भोपळ्यात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे आपण बऱ्याच गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुधी भोपळ्याचा ज्युस शरीराकरता उपयुक्त आहे. बरेच लोक हा ज्युस व्यायाम करून झाल्यानंतर पितात. परंतु तुम्हाला माहित आहे का या दुधी भोपळ्याच्या ज्युसचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. ज्याच्या अतिसेवनाने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
दुधी भोपळ्याचा ज्युस जास्त प्रमाणात प्यायल्याने रक्तदाब कमी होण्याचा धोका वाढतो. या ज्सुसमध्ये पोटॅशिअमचे प्रमाण कमी असते. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
दुधी भोपळ्याच्या ज्युसचे जास्त सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते. यामुळे लूज मोशन आणि उलट्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. एवढेच नाही तर ज्यूस बनवताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर काही वेळा बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.
जे लोक मधुमेह आजाराने ग्रस्त आहेत, त्यांनी दुधी भोपळ्याच्या ज्युसचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. जर तुम्ही हा ज्युस जास्त प्रमाणात प्यायला तर त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे अचानक चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे या समस्या उद्भवतात.
दुधी भोपळ्याच्या ज्युसमध्ये असलेले ऑक्सॅलेट गर्भातील बाळासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे गर्भपातही होऊ शकतो. अशा परिस्थितीत दुधी भोपळ्याचा ज्युस पिणे टाळावे. नाहीतर आईवर आणि बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो.
दुधी भोपळ्याचा ज्युस खूप कडू असतो, त्यामुळे अनेकांना तो प्यायल्यानंतर अॅलर्जी होते. हे प्यायल्यानंतर अनेकांना चेहऱ्यावर किंवा हात-पायांवर सूज येणे आणि चेहऱ्यावर पुरळ येऊ शकतात. याशिवाय त्वचेला खाज देखील सुटू शकते.
जे लोक दुधी भोपळ्याच्या ज्युसचे सेवन करतात त्यांनी रस अजिबात कडू नसावा याची काळजी घ्यावी. याच्या कडूपणामुळे पोटात गॅस होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, ते दूर करण्यासाठी, तुम्ही रसामध्ये काळे मीठ, काळी मिरी पावडर, लिंबू, जिरे आणि काही पुदिन्याची पाने टाकून प्या.
दुधी भोपळ्याचा ज्युस दिवसातून एकच ग्लास प्यावा. ज्यामुळे शरीराला नुकसान होणार नाही.
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो. अनेक वेळा लोक काही गोष्टी शरीरासाठी चांगल्या मानतात आणि त्यांचं जास्त प्रमाणात सेवन करायला लागतात, जे अजिबात योग्य नाही.