Hair Care: रात्री केस मोकळे सोडून झोपावं की बांधून? केस गळणं थांबवण्यासाठी कोणती पद्धत योग्य? पाहा...
धकाधकीच्या जीवनात बरेच जण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. केस आणि त्वचेची काळजी घेण्यास देखील त्यांना वेळ नसतो आणि मग अनेक दुष्परिणामांना त्यांना सामोरं जावं लागतं, त्यामुळे वेळात वेळ काढून स्वतःकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही लोक केस बांधून झोपतात, तर काहींना केस मोकळे सोडून झोपण्याची सवय असते. मात्र ज्या वेळी एखादी व्यक्ती केस मोकळे सोडून झोपते, त्यावेळी केस तुटण्यासह इतर समस्या वाढू लागतात.
केस गळणे, केस तुटणे थांबवण्यासाठी अनेकजण केस बांधून झोण्याचा सल्ला देतात. केस बांधून झोपल्याने केस तुटण्याची शक्यता कमी होते.
केसांची वेणी किंवा केस बांधून झोपल्याने केस कमी तुटतात.
झोपण्यापूर्वी केस बांधणं आवश्यक आहे, त्यामुळे केसाची घनता कायम राहते आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं.
केस मोकळे सोडून झोपल्यास केस रुक्ष आणि निर्जीव होतात. झोपेत आपण एका कुशीतून दुसऱ्या कुशीकडे वळतो तेव्हा केस अधिक तुटतात आणि त्यामुळेच सकाळी उठल्यावर उशीभोवती केस पडलेले दिसतात.