Health Tips: फळांवर मीठ घालून खाल्ल्याने होऊ शकते आरोग्याचे नुकसान; वाचा सविस्तर!
फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आंबट-गोड फळेही चवीला चांगली असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकांना वेगवेगळ्या प्रकारे फळे खायला आवडतात. काहीजण मीठ घालून फळांना आहाराचा भाग बनवतात तर काही रस बनवून. फळांचे छोटे तुकडे करून त्यावर मीठ टाकून ते अगदी चवीने खाल्ले जाते, पण असे केल्याने आरोग्याला हानी पोहोचते. फळांवर मीठ टाकल्यानंतर खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात.
मिठासह फळे खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. अशा प्रकारे मीठ खाल्ल्याने मिठाचे प्रमाण वाढू शकते.
अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
जास्त मीठ खाणे किडनीसाठी अजिबात चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनीमध्ये समस्या निर्माण होतात.
आपल्याला किडनीचा आजार असला तरी आपण काही फळे खातो, त्यात मीठ टाकून खाल्ल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. किडनीचे आजार असल्यास अन्नातील मिठाचे प्रमाणही कमी करावे.
मिठासह फळे खाल्ल्याने फळातील संपूर्ण पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत. मीठ घातल्याने फळांमधून पाणी बाहेर येते आणि काही प्रमाणात पोषणही कमी होते.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही..(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)