Share Market Updates: आरबीआयच्या पतधोरणानंतर शेअर बाजारात विक्रीचा जोर, सेन्सेक्स-निफ्टीत घसरण
शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 10.84 अंकांच्या घसरणीनंतर 62,615.52 अंकांवर तर, निफ्टी निर्देशांक 18,638.85 अंकांवर खुला झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले.
आरबीआयने पतधोरणात जाहीर करताना रेपो दरात वाढ केली. त्याचा परिणाम बाजारावरही दिसून आला.
बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक वधारला होता. त्यानंतर घसरण सुरू झाली.
सकाळी 11.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 212 अंकाच्या घसरणीसह 62,413.92 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 70 अंकांच्या घसरणीसह 18,572.70 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी 50 तील 12 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 38 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 8 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 22 कंपन्यांचे शेअर दर घसरले.
बँक निफ्टीत 75 अंकांच्या घसरणीसह 43,063.15 अंकांवर व्यवहार करत होता.
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर रेपो दर आता 6.25 टक्के इतका झाला आहे.
मागील तीन बैठकांपासून रेपो दरात एकूण 1.90 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.