जय भोलेनाथ... यंदा श्रावण महिन्यात 5 सोमवार, असा योग पुन्हा 14 वर्षांनीच येणार
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असे म्हटले जाते. धार्मिक दृष्टीने श्रावणाचे अधिक महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रावण महिना धार्मिक जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच निसर्ग सुंदरतेचं अदभूत रुप दाखवणारही श्रावण आहे. त्यामुळे, श्रावण महिन्याच विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवार पवित्र दिवस मानला जातो.
शिव-पार्वतीची पूजा करुन श्रावण महिन्यातील सोमवारी उपवासही धरतात. त्यामुळे, श्रावण महिन्यातील 4 सोमवारी व्रत धरले जाते. मात्र, यंदाचा श्रावण अतिशय खास आहे, कारण यावेळी श्रावण महिन्यात 5 सोमवार आले असून श्रावण महिन्याची शेवट आणि सुरुवात ही सोमवारी होत आहे.
यंदा श्रावण 5 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे, तर 2 सप्टेंबरला समाप्त होत आहे. श्रावणात दर सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. महिलांनी अर्पण केलेले धान्य पूर्वी मंदिराच्या पुजाऱ्याला दिले जायचे. त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो.
यंदा कुबेर योग, षष्ठ योगही असल्याने श्रावणाचे महत्त्व वाढले आहे. सर्वार्थ सिद्धीसह श्रावणात तीन शुभयोगांची सुरुवात श्रावणाच्या पहिल्या दिवशी होत आहे.
यंदा सोमवार 5 ऑगस्टपासून मंगळवार ३ सप्टेंबरपर्यंत श्रावण आला आहे. यावर्षी श्रावणात 5 सोमवार आणि 5 मंगळवार आले आहेत. यापूर्वी 2021 मध्ये 5 सोमवार आले होते. त्यानंतर, 2038 मध्ये श्रावणात ५ सोमवार येणार आहेत.
श्रावणात रविवारी आदित्य पूजन, सोमवारी महादेव पूजन, मंगळवारी मंगळागौरीपूजन, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी बृहस्पतीपूजन, शुक्रवारी जिवंतिका पूजन आणि शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन करण्यास सांगितले आहे.