Ram madir:प्रभू रामांच्या मूर्तीचा अभिषेक कधी होणार?
अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामांच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अभिषेकाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. (Photo credit: PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: PTI)
त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील तयारी पूर्ण झाली आहे. गर्भगृहात प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: PTI)
22 जानेवारी 2024 हा अभिषेक दिन निश्चित करण्यात आला आहे. 16 जानेवारीपासून मूर्तीच्या अभिषेकाशी संबंधित सर्व विधी सुरू झाले आहेत(Photo credit: PTI)
अभिजित मुहूर्तावर शास्त्रीय परंपरेचे पालन करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. (Photo credit: PTI)
(Photo credit: PTI)
अभिजीत मुहूर्त 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29 वाजून 8 सेकंद ते 12:30 मिनिटे 32 सेकंदापर्यंत असेल. (Photo credit: PTI)
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:च्या हाताने प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.(Photo credit: PTI)
दीपोत्सवाप्रमाणेच प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमही आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.(Photo credit: PTI)
ज्याप्रमाणे अयोध्येत दीपोत्सवाच्या शुभमुहूर्तावर मंदिराची सजावट करण्यात आली होती, त्याचप्रमाणे प्रभू रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या वेळी अयोध्येतील सर्व मठ मंदिरांनाही विशेष फुलांनी सजवण्यात येणार आहे.(Photo credit: PTI)
प्रभू रामांच्या मूर्तीचा अभिषेक पौष महिन्याच्या बाराव्या दिवशी अभिजीत मुहूर्त, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवमशामध्ये होईल(Photo credit: PTI)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)(Photo credit: PTI)