PHOTO : टाळ-मृदंगाचा ठेका, पत्नीची साथ, कडेवर चिमुकला, वारीच्या वाटेवर अमोल मिटकरी सहकुटुंब रमले
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूरचा मुक्काम आटोपून सराटीच्या मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान या पालखी सोहळ्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे सहकुटुंब सहभागी झाले.
दरवर्षी पंढरपूर वारीला जातो. पण या वर्षी 600 किमी प्रवास करुन तुकोबांच्या पालखीत सहभागी झालोय, असं मिटकरी यांनी सांगितलं.
काल पालखीचं दर्शन घेतलं आणि आज पालखीसोबत चालणार आहे, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.
यावेळी अमोल मिटकरी यांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
महाराष्ट्रात चांगला पाऊस होऊ दे, धरणं भरु दे, शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपटी वाढू दे, असं साकडं पांडुरंगाला घालणार आहे.
राज्यात सध्या धार्मिक तेढ निर्माण होत आहेत जर हे दूर करायचे असतील तर अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असंही साकडं विठुरायाला घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अजितदादा यांना पुढील आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळावा, अशी मागणं विठुरायाकडे असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.