Champions Trophy 2013 : आजच्याच दिवशी धोनीनं रचला इतिहास, 10 वर्षांपूर्वी भारतानं कोरलं चॅपियन्स ट्रॉफीवर नाव; फोटोंमधून आठवणींना उजाळा

Team India won Champions Trophy 2013 : 10 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 23 जून 2013 रोजी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. भारताने इतिहासात पहिल्यांदा आयसीसी ट्रॉफी जिंकली.

Champions Trophy 2013 | Team India

1/10
या सोबतच धोनीनं ऐतिहासिक पराक्रम रचला होता. महेंद्र सिंह धोनी तीन आयसीसी व्हाईट-बॉल स्पर्धा जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला.
2/10
भारताने 2013 मध्ये आजच्याच दिवशी इंग्लंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पावसांमुळे रोमांचक ठरलेला हा सामना टीम इंडियाने पाच धावांनी जिंकला आणि धोनी तीन फॉरमॅटमध्ये आयसीसी स्पर्धा जिंकणारा पहिला कर्णधार ठरला.
3/10
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी धोनीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2011 आणि टी-20 वर्ल्ड कप 2007 ही जिंकला. अद्याप कोणत्याही भारतीय कर्णधाराला ही कामगिरी करता आलेली नाही.
4/10
बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर अंतिम सामन्यावेळी पाऊस पडला. त्यामुळे 50-50 षटकांचा सामना 20-20 षटकांचा करावा लागला होता. पाऊस थांबल्यानंतर सामना खेळवण्यात आला.
5/10
इंग्लंडचा कर्णधार ॲलिस्टर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या नवी सलामी जोडी पहिल्यांदाच मैदानावर उतरली. रोहित चौथ्याच षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतला. धवनने 31 धावा केल्यानंतर विराट कोहलीसोबत डाव सावरला.
6/10
धवन बाद होताच दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनी संघाच्या धावसंख्येत केवळ 2 धावांची भर घालून बाद झाले. यावेळी जडेजाने कोहलीसोबत 47 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. कोहली 43 धावा करून बाद झाला, तर जडेजाने 25 चेंडूत नाबाद 33 धावा करून टीम इंडियाची धावसंख्या 7 विकेट्सवर 129 पर्यंत नेली.
7/10
130 धावसंख्येचा पाठलाग करताना यजमान इंग्लंडचा कर्णधार दुसऱ्याच षटकात बाद झाला. इंग्लंडच्या फलंदाजांवर भारताचे गोलंदाज वरचढ ठरले. इंग्लंडने पटापट विकेट गमावल्या. नवव्या षटकापर्यंत इंग्लंडने 46 धावसंख्येवर चार विकेट गमावल्या होत्या. इंग्लंडला 16 चेंडूत 20 धावांची गरज होती.
8/10
इंग्लंडला 12 चेंडूत 19 धावांची गरज होती. कर्णधार धोनीने गोलंदाजी जडेजावर सोपवली. जडेजाने अवघ्या तीन चेंडूत जोस बटलर आणि टीम ब्रेसनन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आणि 4 धावा देत इंग्लंडला बॅकफूटवर आणलं.
9/10
यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावांची गरज होती. धोनीनं अश्विनच्या हाती चेंडू दिला. या षटकात दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर एक, त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर प्रत्येकी 2-2 धावा काढल्या.
10/10
शेवटच्या चेंडूवर इंग्लंडला सहा धावांची गरज होती. अश्विन समोर स्ट्राईकवर जेम्स ट्रेडवेल होता. अश्विनने स्टम्पच्या दिशेने चेंडू फेकला. ट्रेडवेलने बॅट भिरकावली पण, ती चेंडूला लागलीच नाही आणि भारताने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला.
Sponsored Links by Taboola