Ashadhi Ekadshi : 'ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम', संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे विहंगम दृश्य, पाहा फोटो
'अवघा रंग एक झाला, जय जय राम कृष्ण हरी' या ओळी गात आणि टाळ मृदुंगावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी वारीचा प्रत्येक कठीण टप्पा पार करत मार्गक्रमण करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्यापासून 23 जून पर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता या प्रवासादरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. तावडे हे जेजुरी ते वाल्हे यादरम्यान या वारी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात.
हा पालखी सोहळा (Ashadhi Wari 2023) पुणे जिल्ह्यातुन सातारा 18 जूनला पाडेगाव, लोणंद येथे प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 23 जूनला सोलापूर जिल्हयात जाणार आहे.
या वर्षी सुद्धा जेजुरीपासून ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यादरम्यान टाळ वाजवत भजन म्हणत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते तल्लीन झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर त्यांनी ठेकाही धरला.
या घाटात सर्वदूर वारकऱ्यांचा मेळा दिसत होता. संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीसाठी जसा दिवे घाट कठिण टप्पा असतो. त्याच प्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी कठीण टप्पा असतो.
हाच कठrण टप्पा वारकऱ्यांनी हसत खेळत आणि फुगड्या घालत पार केला आहे. हा घाट निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. यावेळी निसर्ग तुकाराम महाराजांची वाट बघत असल्याचं चित्र दिसत होतं.
लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाट, रोटी घाटातील विंहंगम दृष्य़ पाहायला मिळालं. त्यानंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी उद्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्यापासून 23 जून पर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्यापासून 23 जून पर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. त्यानिमित्ताने पोलीस आणि प्रशासनाने नियोजन केले आहे. (सर्व फोटो : प्रवीण गायकवाड, सोलापूर)