Ganesh Chaturthi Recipes : गणेश चतुर्थीपासून 10 दिवस बाप्पाला अर्पण करा 'हे' नैवेद्य, विघ्नहर्ता होतील प्रसन्न

पहिल्या दिवशी गणपतीला मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. पौराणिक कथेनुसार, देवी पार्वती रोज गणपतीसाठी मोदक बनवायची.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दुसऱ्या दिवशी गणपतीला बेसनाचे लाडू अर्पण करावेत.

तिसऱ्या दिवशी गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येतो. चांगला जोडीदार मिळेल, अशी मान्यता आहे.
चौथ्या दिवशी गणेशाला मालपुआ अर्पण करू शकता. असे मानले जाते लग्नात अडथळे येत असतील तर, गणपतीच्या आशीर्वादाने विवाह लवकर होतो
पाचव्या दिवशी गजाननाला रव्याची खीर अर्पण करावी. असे म्हणतात की यामुळे शत्रू शांत होतात.
सहाव्या दिवशी गणेशाला मावा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे बाप्पा प्रसन्न होतील
सातव्या दिवशी बाप्पाच्या पूजेत नारळ ठेवा. नारळाला गणपतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात कधीही नकारात्मक शक्ती येत नाहीत.
आठव्या दिवशी गणेशाला पंचमेवा अर्पण करा, ग्रहांच्या अशुभतेमुळे प्रगती थांबली असेल तर, सर्व अडथळे दूर होतात.
नवव्या दिवशी बाप्पाच्या पूजेमध्ये मखाणा खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते, यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. गणेशजी हे माता लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत.
शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला सकाळी गणपतीची पूजा करावी. विसर्जन करण्यापूर्वी त्यांना केळीचा प्रसाद द्यावा. त्यानंतर हे अन्न सर्व लोकांमध्ये वाटून घ्या. असे मानले जाते की याने बाप्पा सर्व संकटे दूर करतात.