Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या स्वच्छता सेवेची संधी पुण्यातील बीव्हीजी इंडिया लिमिटेड कंपनीला!
कोट्यावधी भारतीयांच्या आस्थेचं प्रतीक असलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा अनंदात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. (Photo Credit :ABP Majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसन्माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते या मंदिराचे उद्घाटन पार पडले. येत्या काही वर्षात कोट्यावधी भाविक प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरिता अयोध्या नगरीत येणार अल्याचे संगण्यात येत आहे. (Photo Credit :ABP Majha)
या भव्य दिव्य मंदिराच्या स्वच्छता व्यवस्थापनाची जबाबदारी देशातील सर्वोत्तम अशा बीव्हीजी इंडिया लिमिटेड या पुणे स्थित कंपनीकडे देण्यात आली आहे. पुणेकरांच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे की,कोट्यावधी भाविकांच्या चरण धुळीची स्वच्छता सेवा करण्याचे काम पुण्यातील कंपनीला देण्यात आलें आहे.(Photo Credit :ABP Majha)
भारत विकास ग्रुप ही सुप्रसिद्ध उद्योजक श्री हणमंतराव गायकवाड स्थापित कंपनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रतिष्ठानांची एकात्मिक सेवा पुरवठा करणारी कंपनी आहे. (Photo Credit :ABP Majha)
ज्यामध्ये राष्ट्रपती भवन माननीय पंतप्रधानांचे कार्यालय व निवास, नवे व जुने संसद भवन, सुप्रीम कोर्ट ई शासकीय व निमशासकीय अत्यंत महत्त्वाची कार्यालये तसेच देशातील २४ महत्त्वाची विमानतळे, २० प्रमुख मंदिरे व शेकडो खाजगी कंपन्या व आस्थापनांना बीव्हीजी इंडिया लिमिटेड ही कंपनी सेवा देते. बीव्हीजी उद्योग समुह विविध क्षेत्रात कार्यरत असून सध्या ८०,००० पेक्षा जास्त कर्मचारी या समूहात आहेत. (Photo Credit :ABP Majha)
बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीला श्री रामलल्ला गर्भगृहासहित संपूर्ण रामलल्ला मंदिर, यात्री सुविधा केंद्र, सर्व स्वच्छतागृहे, अंतर्गत रस्ते व इ स्थानांच्या स्वच्छता सेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. (Photo Credit :ABP Majha)
बीव्हीजी यासाठी पर्यावरणपूरक व बायोडिग्रेडेबल स्वछता सामग्रीचा वापर करत आहे. देशातील भाविकांच्या अत्यंत वर्दळीच्या २० मंदिरांमध्ये सध्या ते सेवा देत आहोत.(Photo Credit :ABP Majha)
पण श्री राम मंदिराने या सर्व सेवांवर कळस चढविला आहे. या सेवेकरीता जवळपास २०० स्वच्छता सेवकांची नियुक्ती करत असून, ५० लक्ष रुपयाची अत्याधुनिक मशिनरी सुद्धा खरेदी करून त्याद्वारे स्वच्छता सेवा सुरू केली आहे. अशी माहिती बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष श्री हणमंतराव गायकवाड यांनी दिली.(Photo Credit :ABP Majha)
देशातील इतर स्वच्छता सेवा देणाऱ्या कंपन्यांमधून श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने सार्वमताने, सर्वोत्तम दर्जाच्या निकषावर बीव्हीजी इंडिया लिमिटेडचीच निवड करण्यात आली.. (Photo Credit :ABP Majha)
हाही मी माझा सन्मान समजतो असे विनम्र प्रतिपादन श्री गायकवाड यांनी केले. प्रभू श्रीरामांच्या दर्शनाने मनातील मळ दूर होईल, भाविकांच्या पायाची धूळ साफ करण्याचे सौभाग्य मला मिळाले हा माझ्या आतापर्यंतच्या कार्याचा सन्मान झाला असे मला वाटते, असेही श्री गायकवाड म्हणाले.(Photo Credit :ABP Majha)