Ashadhi Wari : तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण, बेलवडीत डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा
देहभान हरपून विठुनामाचा जप करत, तुकाराम महाराजांचा जयघोष करत वारकऱ्यांनी पहिलं गोल रिंगण केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले.
यामुळे वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते.
पालखीला अगोदर पोलीस, नंतर झेंडेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या केल्या.
हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकानी गर्दी केली होती.
पूर्ण देहभान हरपून विठुनामाचा जप करीत,तुकाराम महाराजांचा जयघोष करीत वारक-यांनी पहिले गोल रिंगण केले.
यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
बेलवाडी मधले गोल रिंगण झाल्यानंतर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगाव केतकीमध्ये मुक्कामाला जातो