Aishwarya-Aaradhya Photo : सोबत आराध्या आणि ऐश्वर्याची हटके हेअर स्टाईल... एअरपोर्टवरील ऐश्वर्याचे फोटो
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन मंगळवारी रात्री मुलगी आराध्यासोबत मुंबई विमानतळावर दिसले. यादरम्यान नेटकऱ्यांनी बच्चन कुटुंबियांच्या दोन बदलांचं निरीक्षण केलं, ज्याची खूप चर्चा केली जात आहे.
Aishwarya-Aaradhya Photo
1/9
ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन मुंबई विमातळावर दिसून आले. यावेळी सोबत त्यांची मुलगी आराध्याही होती. हे तिघेही सुट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात फिरायला गेले.
2/9
यावेळी विमानतळावर ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसून आले.
3/9
आराध्याने रेड जॅकेटसोबत ब्लॅक ट्राउजर घातला होता. यावेळी तिघांनीही कॅमेऱ्यासमोर स्माईल देत पोज दिली.
4/9
या दरम्यान नेटकऱ्यांनी दोन मोठे बदल नोटीस केले आहेत. ज्याची सध्या खूप चर्चा केली जात आहे.
5/9
खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्याला तिच्या सेम हेअरस्टाइलवरून ट्रोल केलं जात होतं. अशातच काल रात्री ऐश्वर्या तिच्या हटके हेअरस्टाईलमध्ये दिसली. तर दुसरीकडे काही लोक ट्रोलिंगचा प्रभाव पडल्यामुळे ऐश्वर्या नवीन लूकमध्ये दिसून येत आहे असेही म्हणत आहेत.
6/9
या दरम्यान नेटकऱ्यांना आणखी एक बदल दिसून आला. ऐश्वर्या नेहमी तिची मुलगी आराध्याचा हात धरताना दिसून येते. पण कालच्या रात्री ऐश्वर्याने असं काहीच केलं नाही.
7/9
ऐश्वर्या राय तिच्या बदललेल्या हेअरस्टाईलमुळे खूपच गोड आणि सुंदर दिसत होती.
8/9
यावेळी मुंबई विमानतळावर उपस्थित असलेल्या चाहत्यांकडून ऐश्वर्या राय,आराध्या आणि अभिषेक बच्चन यांचे फोटो काढण्यात आले.
9/9
असं म्हटलं जातेय की, बच्चन फॅमिली सुटीचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला निघाले आहेत.
Published at : 14 Jun 2023 05:32 PM (IST)