Skin Care: स्किन टॅनिंगमुळे त्रस्त आहात? कच्चा बटाटा ठरेल लाभदायी; 'अशा' प्रकारे करा वापर
आपल्याकडे स्वयंपाकात, भाजीमध्ये बटाट्याचा वापर जास्त केला जातो. स्वयंपाकघरातही ते सहज उपलब्ध असतात. तुम्हाला माहीत आहे का बटाट्यामुळे चेहऱ्याच्या टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबटाटे त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. यामध्ये लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-डी असे गुणधर्म असतात.
डोळ्यांना थंडावा देण्यासाठी कच्चे बटाटे कापून डोळ्यांवर ठेवण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. तर, त्वचेसाठी देखील कच्चा बटाटा योग्य पद्धतीने वापरला, तर फायदेशीर ठरतो.
चेहऱ्यावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर खूप टॅनिंग झाले असेल, तर तुम्ही तिथे बटाट्याचा पॅक लावा.
यासाठी कच्चा बटाटा, गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्र मिसळा. हा पॅक बनवण्यासाठी प्रथम कच्चे बटाटे किसून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मुलतानी माती आणि गुलाबपाणी मिसळून लावा.
हा पॅक 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर चेहरा धुवा. असे नियमित केल्याने तुमच्या त्वचेवरील टॅनिंग देखील निघून जाईल आणि तुमची त्वचा देखील चमकू लागेल.
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बटाटा आणि हळदीचा फेस पॅक लाभदायी ठरतो.
यासाठी अर्धा बटाटा किसून, त्यात चिमूटभर हळद घाला. हा पॅक मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. अर्धा तास तसाच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
बटाटा पॅकच्या रोजच्या वापराने चेहऱ्याचा रंगही उजळ होतो.