Pulses Cause Acidy : डाळींचं सेवन केल्यानंतर तुम्हालाही अॅसिडीटीचा त्रास होतो? जाणून घ्या कोणत्या डाळींमुळे होते ही समस्या
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही कडधान्ये खावीत. मसूरमध्ये भरपूर प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आढळतात. मात्र, काहींना डाळ खाल्ल्यानंतर अॅसिडीटीची समस्या उद्भवते. त्यामुळे शक्यतो मसूरची डाळ दिवसाच खावी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमसूर हे उच्च प्रथिनयुक्त आहार आहे, ते खाल्ल्यानंतर अनेक वेळा गॅसची समस्याही सुरू होते. मसूर खाल्ल्याने अॅसिड रिफ्लक्सची समस्या सुरू होते. अशा स्थितीत काही डाळींचे सेवन करू नये.
वाटाणा डाळ खाल्ल्यानेही अॅसिडीटीचा त्रास होतो. मुळात वटाणा शरीरात पचवणं कठीण आहे त्यामुळे तो दिवसाच खावा.
उडदाची डाळसुद्धा शरीरात पचायला वेळ लागतो. त्यामुळे ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी उडीद डाळ खाऊ नये. यामुळे गॅस होऊ शकतो.
हरभरा डाळ खाल्ल्याने श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होतो. ते पचवणं कठीण होऊन बसतं. हरभऱ्याची डाळ जास्त खाल्ल्याने पोटात गॅस आणि अॅसिडिटी होऊ शकते.
ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी राजमा कमी प्रमाणात खावा. राजमा जास्त खाल्ल्याने गॅस तयार होतो.
तूर डाळीमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते. त्यामुळे तूर डाळ कमी प्रमाणात आणि दिवसाच खावी.