Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pre Wedding Shoot : भारतात 'या' ठिकाणी करू शकता अप्रतिम प्री-वेडिंग शूट!
पार्क हयात गोवा रिसॉर्ट एंड स्पा, गोवा़ - येथील पार्क हयात रिसॉर्ट आणि स्पा अतिशय सुंदर आहे. गोव्यात वेगवेगळ्या समुद्रकिनाऱ्यांवर फोटोशूट करू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहुमायूं का मकबरा, दिल्ली - दिल्लीत असलेला हुमायूचा मकबरा त्याच्या सौंदर्यासाठी जगभरात ओळखला जातो. जर तुम्हाला लक्झरी वेडिंग सूट घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणला भेट दिली पाहिजे. मुघलकालीन इतिहासाने बनलेल्या या ठिकाणाचे सौंदर्य अप्रतिम आहे.
ताज रामबाग पॅलेस, (जयपुर) - जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये राजस्थानच्या वारसाचे सौंदर्य आहे. प्री-वेडिंग फोटोशूटसाठीही हे हॉटेल उत्तम पर्याय आहे. येथील सुंदर राजस्थानी वास्तुकला ही येथील खासियत आहे जी लोकांना आकर्षित करते.
ताज महल, (आगरा) - आग्र्याचा ताजमहाल हा मुमताज आणि शहाजहान यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. इथूनच तुमच्या आयुष्याची नवी सुरूवात करू शकता. हे लोकेशन लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटसाठी योग्य आहे.
नीमराना फोर्ट पॅलेस, (अलवर) - राजस्थानमधील अलवर येथील नीमराना फोर्ट पॅलेस, ज्याचे आता हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे, ते देखील त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. या लोकेशनवर प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता.
रुशीकोंडा बीच (विशाखापट्टणम) - विशाखापट्टणमचा रुशीकोंडा बीच आपल्या सौंदर्यासाठीही ओळखला जातो. प्री-वेडिंग फोटोशूट यावरही खूप सुंदर असेल. या लोकेशनचे वैशिष्ट्य म्हणजे कमी गर्दी असेल तर फोटोशूट उत्तम प्रकारे करता येते.
फ्रेंच क्वार्टर (पाँडिचेरी) - पाँडिचेरीचा फ्रेंच क्वार्टर त्याच्या मोहक वास्तुकलेसाठी ओळखला जातो. हे स्थान तुम्हाला फ्रान्समध्ये आल्याचा भास देईल. येथे प्री-वेडिंग फोटोशूट केल्यानंतर तुम्हाला हे फोटोशूट परदेशात झाल्याचे वाटेल.
खजुराहो, (मध्यप्रदेश) - मध्य प्रदेशातील खजुराहो हे त्याच्या पौराणिक वास्तुकलेसाठी ओळखले जाते. खजुराहोमध्ये प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अनेक लोक येतात.
कुमोरतुली, (कोलकाता) - तुम्हाला कलात्मक थीमवर आधारित तुमचे प्री-वेडिंग फोटोशूट ठेवायचे असेल, तर हे लोकेशन त्यासाठी योग्य आहे. हे स्थान एक कलात्मक वातावरण देणार आहे.
द ओबेरॉय उदयविलास, (उदयपुर) - तुमचे प्री-वेडिंग फोटोशूट अविस्मरणीय बनवायचंय. तर हे ठिकाण खूप इथला नैसर्गिक पार्श्वभूमी, रॉयल टच, पूल व्ह्यू हे खास बनवतात.
कुमारकोम लेक रिसॉर्ट, (कुमारकोम) - केरळच्या कुमारकोममध्ये असलेले हे रिसॉर्ट आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या रिसॉर्टमध्ये खूप सुंदर प्री-वेडिंग फोटोशूट केले जातात. डेस्टिनेशन वेडिंगसाठीही लोक इथे पोहोचतात.
ताज उम्मेद भवन पॅलेस (जोधपूर) - जोधपूरचा उम्मेद भवन पॅलेस त्याच्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. देसी गर्ल प्रियांका चोप्राचेही लग्न याच पॅलेसमध्ये झाले होते. लग्नाआधी प्री-वेडिंग फोटोशूटसाठीही हे ठिकाण योग्य आहे.
ताज फलकनुमा पॅलेस (हैदराबाद) - हैदराबादमधील ताज फलकनुमा पॅलेस जिथे सलमान खानची बहीण अर्पिताचे लग्न झाले ते खूपच सुंदर आहे. हे लोकेशन प्री-वेडिंग फोटोशूटसाठीही योग्य आहे. हे लोकेशन फोटोशूटला रॉयल लूक देखील देईल.