Pawna Dam : पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण भरलं, नदीत विसर्ग सुरु
पावसाचा जोर वाढल्याने पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं असून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे

Pawna Dam
1/9
मावळात कालपासून पावसाने पवना धरण परिसरात चांगलाच जोर धरला आहे.
2/9
गेल्या 24 तासात तब्बल 73 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
3/9
त्यामुळे पवना धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहे.
4/9
पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
5/9
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता वीजनिर्मिती गृहाद्वारे पवना नदीमध्ये विसर्ग करण्यात आला.
6/9
पवना नदीत सकाळी सहा वाजता 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला
7/9
धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता सकाळी आठ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरुन 2100 क्यूसेक विसर्ग करण्यात आला.
8/9
असा एकूण 3500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीत करण्यात आला.
9/9
पवना नदीकाठच्या सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
Published at : 08 Sep 2023 09:18 AM (IST)