Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे आहेत? आहारातील 'या' घटकांकडे लक्ष द्या
चेहऱ्यावरील लहान पिंपल्स आपल्याला त्रास देतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला अशा डाएटबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही पिंपल्सच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन अनेक वेळा पिंपल्स येण्यास कारण ठरतात. पिंपल्स कमी होण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]
जे लोक जास्त साखरयुक्त पदार्थ खातात, त्यांना पिंपल्स जास्त येतात. तुम्ही चहा, चॉकलेट, गोड रस किंवा मिठाईच्या माध्यमातून मिठाईचे सेवन करत असता. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्ही तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी केले किंवा काही काळ साखर पूर्णपणे बंद केली तर तुम्हाला दिसेल की तुमचे पिंपल्स कमी होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
मांसाहारी पदार्थ किंवा मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही पिंपल्स वाढतात, त्यामुळे काही काळ अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करा. [Photo Credit : Pexel.com]
दोन चमचे कोरफडीचा गर पाण्यात मिसळून प्यायल्यास पिंपल्स लवकर निघून जातात. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने त्वचा ताजी दिसू लागते.[Photo Credit : Pexel.com]
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या खा, यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल. [Photo Credit : Pexel.com]
तुम्हाला कोणत्या वेळी जास्त पिंपल्स येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या वेळी आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करावी.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]