River Rafting : रिव्हर राफ्टिंग करणार आहात आधी या बाबी लक्षात घ्या !
लोकांना पाण्यातील साहसी उपक्रम करायला आवडतात. पण, त्यावेळी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यापैकी एक रिव्हर राफ्टिंग. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे रिव्हर राफ्टिंगचे नियोजन करण्यापूर्वी येथे दिलेल्या सुरक्षेची माहिती जरूर जाणून घ्या. [Photo Credit : Pexel.com]
राफ्टिंगच्या वेळी एक मार्गदर्शक नियुक्त केला जातो. मार्गदर्शक प्रथम सुरक्षिततेशी संबंधित काही गोष्टी सांगतात, त्या काळजीपूर्वक ऐका . [Photo Credit : Pexel.com]
कारण राफ्टिंग करताना गाईडच्या आदेशाचे पालन करावे लागेल तेव्हा या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडतील.[Photo Credit : Pexel.com]
व्यावसायिक राफ्टिंग केंद्रातून नेहमी राफ्टिंग बुक करा. बुकिंग करताना त्यांना महत्त्वाचे प्रश्न विचारा. [Photo Credit : Pexel.com]
ते या व्यवसायात किती वर्षांपासून आहेत?व्यवसायाबद्दल अनुभव आदि बाबींची चौकशी करा . [Photo Credit : Pexel.com]
सुरक्षितता लक्षात घेऊन राफ्टिंगला जाताना लाईफ जॅकेट आणि हेल्मेट घाला.काही लोक पोहायला येतात असे सांगून जॅकेट घालण्यास नकार देतात. अशी चूक करू नका. [Photo Credit : Pexel.com]
राफ्टिंगला जाण्यापूर्वी स्टायलिश कपड्यांऐवजी आरामदायक कपडे निवडा. स्विमसूट किंवा नायलॉन कपडे निवडणे चांगले होईल. [Photo Credit : Pexel.com]
राफ्टिंग करताना माणसाला सूर्यकिरण आणि पाण्यात बराच वेळ राहावे लागते. तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावायला विसरू नका.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]