Eating Mangoes : उन्हाळ्यात आंबे धुवून खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
जर तुम्ही आंबे खायचे शौकीन असाल तर जाणून घ्या आंबा खाण्याची योग्य पद्धत.कारण तुमची एक चूक तुम्हाला गंभीर आजारी बनवू शकते.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंबा खाताना झालेली चूक तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. आंबा खाण्याच्या अर्धा तास आधी हे काम करा.[Photo Credit : Pexel.com]
आंबा पाण्यात भिजवून ठेवण्यामागील तर्क: फायटिक ॲसिड बाहेर पडतं: आंबा भिजवून ठेवल्याने त्याचे फायटिक ॲसिड बाहेर पडतं. [Photo Credit : Pexel.com]
त्यात असलेले फायटिक ऍसिड हे पोषक तत्व विरोधी मानले जाते. हे ऍसिड कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांना शरीरात विरघळण्यापासून रोखते. [Photo Credit : Pexel.com]
ज्यामुळे शरीरात मिनरल्सची कमतरता होऊ शकते. यासाठी आंबा खाण्यापूर्वी काही तास पाण्यात भिजत ठेवला जातो. ज्यामुळे त्याचे फायटिक ॲसिड निघून जाते.[Photo Credit : Pexel.com]
कमी कीटकनाशके असतात : आंबा पिकवण्यासाठी कार्बाइड किंवा कीटकनाशके वापरली जातात. या रसायनामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्याही निर्माण होतात. [Photo Credit : Pexel.com]
डोकेदुखीप्रमाणेच बद्धकोष्ठता आणि इतर प्रकारच्या समस्या उद्भवतात. या घातक रसायनांमुळे त्वचा, डोळे आणि श्वासाला त्रास होतो. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी अर्धा तास भिजत घालावा.[Photo Credit : Pexel.com]
आंब्याची उष्णता दूर करणे फार महत्वाचे आहे. आंब्याचा स्वभाव उष्ण असतो. जास्त प्रमाणात खाल्ल्याने लोकांच्या चेहऱ्यावर पुरळ उठतात.[Photo Credit : Pexel.com]
कधी कधी मळमळ आणि उलटीची समस्याही सुरू होते. आंब्याला पाण्यात भिजवून ठेवल्याने त्याची उष्णता निघून जाते.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]