Divyanka Tripathi Accident: छोट्या पडद्यावरील क्वीन अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा भीषण अपघात!
दिव्यांका त्रिपाठीच्या पीआर टीमने दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला. त्यामुळे विवेक दहियाने आपला लाइव्ह सेशन कार्यक्रम रद्द केला. दिव्यांकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Divyanka Tripathi Accident
1/8
छोट्या पडद्यावरील क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा (Divyanka Tripathi) भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर दिव्यांकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
2/8
दिव्यांचा पती आणि अभिनेता विवेक दहियाने (Vivek Dahiya) आपले सगळे कार्यक्रम रद्द करत रुग्णालयात धाव घेतली आहे. सध्या दिव्यांकाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
3/8
दिव्यांका त्रिपाठीच्या पीआर टीमने दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांका त्रिपाठीचा अपघात झाला. त्यामुळे विवेक दहियाने आपला लाइव्ह सेशन कार्यक्रम रद्द केला. दिव्यांकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
4/8
सध्या विवेक तिच्यासोबत रुग्णालयात आहे. आपल्या सदिच्छांसाठी, सहकार्यासाठी आभार मानत असल्याचे दिव्यांका-विवेकच्या टीमकडून सांगण्यात आले.
5/8
विवेक दहियाने आपल्या इन्स्टा स्टोरीवर दिव्यांकाचा एक्स-रे शेअर केला आहे. दिव्यांकाच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असून शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
6/8
काही महिन्यांपूर्वी दिव्यांकावर अंडरवेट सर्जरी झाली होती. दिव्यांकाने पोस्ट शेअर करत याची माहिती दिली होती.
7/8
शस्त्रक्रिया होण्यापासून ते त्यातून पूर्णपणे बरं होईपर्यंत मी डेली रुटीन खूपच काटेकोरपणे फॉलो केले आहे.
8/8
माझ्या चेहऱ्यावर जे हास्य दिसत आहे, त्याचे कारण माझे पती असून त्यांनी एक क्षणही माझ्या चेहऱ्यावरील हसू कमी केलं नाही, असे दिव्यांकाने आपल्या पोस्टवर म्हटले. (photo:divyankatripathidahiya/ig)
Published at : 19 Apr 2024 05:10 PM (IST)