Parenting :लग्नाआगोदार मुलीला ह्या गोष्टी पालकांनी जरूर सांगा .
लग्नानंतर मुलीही स्वतंत्र व्हायला शिकल्या आहेत. नवीन कुटुंब तिला स्वतःचे बनवण्याची जबाबदारी मुलीची आहे.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलग्नाच्या वेळी पालक आपल्या मुलीला अनेक गोष्टी समजावून सांगतात आणि शिकवतात. पण काही महत्त्वाच्या गोष्टी तिला सांगितल्या नाहीत तर मुलीला सासरच्या घरात एकटेपणा वाटू शकतो.[Photo Credit : Pexel.com]
पुढील काही गोष्टी आईवडील आपल्या मुलींना शिकवू शकतात. जाणून घ्या काय आहेत त्या गोष्टी.[Photo Credit : Pexel.com]
आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणे महत्त्वाचे आहे : कदाचित तुमच्या मुलीच्या पतीचा पगार इतका चांगला असेल की तुमच्या मुलीला कधीही काम करण्याची गरज भासणार नाही, पण तुमच्या मुलीला समजावून सांगा की आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे महत्त्वाचे आहे.[Photo Credit : Pexel.com]
जर तिने स्वतःच्या पैशाने तिच्या गरजा पूर्ण केल्या तर तिला कधीही अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, विशेषतः तिला कधीही ऐकावे लागणार नाही.[Photo Credit : Pexel.com]
कुटुंबासोंबत जुळवून घ्यावे : नवीन घरात नविन सदस्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करायचे प्रयत्न करावेत. [Photo Credit : Pexel.com]
छोट्या-छोट्या समस्यांमध्ये संयम गमावू नका : नवीन कुटुंबात असे वेगवेगळे लोक आहेत जे घरातील नवीन सदस्याला कठोर शब्द बोलण्यापूर्वी दोनदा विचार करत नाहीत. अशा वेळी संयमाने वागावे हे सांगा. [Photo Credit : Pexel.com]
तुमच्या मुलीला समजावून सांगा की काही किरकोळ समस्या उद्भवल्यास तिने संयमाने वागले पाहिजे आणि तिचा आदर गमावू नये. मुलीला तिचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे तिने तो योग्य पद्धतीने व्यक्त करावे.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel.com]