Rose Day 2024: रोझ डे च्या दिवशी या रंगाचे 'गुलाब' देऊन बनवा आपली नाती खास !
व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. रोझ डे व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला, मित्राला किंवा खास व्यक्तीला गुलाबाचे फूल देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्हॅलेंटाईन वीकसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. फुलांची दुकाने गुलाबाच्या फुलांनी गजबजली आहेत. व्हॅलेंटाईन आठवड्यातील एक दिवस खास गुलाबांना समर्पित केला जातो. [Photo Credit : Pexel.com]
जाणून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यातील व्यक्तींना कोणते गुलाब देऊन खुश करू शकता आणि विविध रंगांचे महत्व काय ... [Photo Credit : Pexel.com]
गुलाबाच्या रंगांचा अर्थ : लाल गुलाब - तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर लाल गुलाब प्रेम व्यक्त करण्यासाठी दिले जाऊ शकते[Photo Credit : Pexel.com]
पांढरा गुलाब- तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागायची आहे त्या व्यक्तीला पांढरे गुलाब द्या . [Photo Credit : Pexel.com]
पिवळा गुलाब - जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर त्याला पिवळे गुलाब द्या. [Photo Credit : Pexel.com]
केशरी रंगाचे गुलाब- एखाद्याला केशरी रंगाचे गुलाब देऊन आपली आवड व्यक्त करा.[Photo Credit : Pexel.com]
गुलाबी गुलाब - तुमच्या जिवलग मित्राला देऊन तुम्ही तुमची मैत्री अधिक घट्ट करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
रोझ डे का साजरा करावा?गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. गुलाबाचे वेगवेगळे रंग भावना व्यक्त करतात. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाब वापरा. तुमच्या प्रेयसीला गुलाबाचे फूल देऊन तुम्ही तुमच्या हृदयात दडलेले प्रेम व्यक्त करू शकता. [Photo Credit : Pexel.com]
जर तुम्हाला कोणावर प्रेम असेल, किंवा एखाद्याशी मैत्री करायची असेल, एखाद्याला आवडत असेल आणि प्रेमाची संधी मागायची असेल तर तुम्ही गुलाबाची फुलेही भेट म्हणून देऊ शकता. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]