Stress In Youth : तरुणांमध्ये वाढत्या तणावाची ही आहे मोठी समस्या...
सोशल मीडियावर सतत वेळ घालवल्याने तरुणांच्या मनावर परिणाम होत आहे.त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका अभ्यासातून समोर आले आहे की, सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये तणाव झपाट्याने वाढत आहे,ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सोशल मीडिया आणि तणाव यांच्यातील संबंध जाणून घेऊया.. [Photo Credit : Pexel.com]
सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये तणाव वाढत आहे: सोशल मीडियावर अधिक वेळ घालवल्याने, बहुतेक तरुण अभ्यास, मैत्री, कुटुंब किंवा इतर गोष्टींपासून दूर जाऊ लागतात. [Photo Credit : Pexel.com]
यामुळे ते एकाकी पडतात आणि मानसिक समस्यांना बळी पडतात.ते सहसा सोशल मीडियावर इतरांशी स्वतःची तुलना करू लागतात,ज्यामुळे त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो,ज्यामुळे तणाव वाढू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
रात्री उशिरापर्यंत फोन वापरल्याने तरुणाईचा दिनक्रम विस्कळीत झाल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यांची चिडचिड वाढत आहे. [Photo Credit : Pexel.com]
मोबाईल स्क्रीन आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे झोपेला मदत करणारा हार्मोन मेलोटोनियम बाहेर पडत नाही आणि नंतर समस्या वाढू लागतात.[Photo Credit : Pexel.com]
सोशल मीडियामुळे तणाव वाढण्याची 4 कारणे 1. सोशल मीडियाचा वापर केल्याने तरुणाईला काहीतरी चुकल्यासारखे वाटू लागते. त्यांच्या या भीतीला FOMO (Fear of Missing Out) असे म्हणतात, ज्यामुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढू शकते.[Photo Credit : Pexel.com]
2.अनेक वेळा तरुणांना सोशल मीडियावर ऑनलाइन छळ आणि धमक्यांचा सामना करावा लागतो,ज्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो.[Photo Credit : Pexel.com]
3.सोशल मीडियाचा सतत वापर केल्याने झोप कमी होऊ शकते.रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने थकवा,लक्ष न लागणे आणि चिडचिड होऊ शकते, जी तणावाची लक्षणे आहेत.[Photo Credit : Pexel.com]
4.सोशल मीडियामुले तरुणांमध्ये वाढती असभ्यता, वास्तविक जगापासून वेगळे करणे,अशा अनेक समस्यांना जावे लागते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]