IPL 2024 SRH Kavya Maran: ट्रॉफी जिंकली, पण संपत्तीत काव्या मारनच पुढे; शाहरुखपेक्षा चौपट श्रीमंत, नेमकं करते तरी काय?
आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात आला. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्या झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाताने बाजी मारली. (image credit-social media)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकाताने हैदराबादचा 8 विकेट्सने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादचं तिसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याचं स्वप्न मोडलं.(image credit-social media)
सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर संघाची मालकीन काव्या मारन (Kavya Maran) भर मैदानात रडताना दिसली. तसेच सामन्यानंतर हैदराबादच्या खेळाडूंचे काव्याने आभरही मानले. (image credit-social media)
प्रत्येक आयपीएलच्या हंगामात काव्या मारनची चर्चा होत असते. याचदरम्यान काव्या मारनच्या संपत्तीची देखील चर्चा रंगली आहे. काव्या मारन कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. (image credit-social media)
काव्या मारनचा जन्म 6 ऑगस्ट 1992 रोजी चेन्नईमध्ये झाला. 33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. ती सनरायझर्स हैदराबाद आयपीएल टीमची मालक आणि सीईओ आहे. (image credit-social media)
काव्याने चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बीकॉम केले आहे, त्यानंतर तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली आहे. (image credit-social media)
33 वर्षीय काव्या मारन ही सन ग्रुप आणि आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिती मारन यांची मुलगी आहे. काव्याचे आजोबा एम करुणानिधी हे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. (image credit-social media)
या रिपोर्टनुसार कलानिती मारन यांची एकूण संपत्ती 24,000 कोटी रुपये इतकी आहे. (image credit-social media)
कलानिती मारन यांच्याकडे अनेक टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रं, रेडिओ स्टेशन्स, फिल्म प्रॉडक्शन हाऊस आणि विकली मॅगझीन्स आहेत.(image credit-social media)
याशिवाय कलानिती मारन हे स्पाइसजेट या विमानसेवेचेही ते मालक आहेत. एक प्रकारे त्यांची सर्व मालमत्ता सध्या काव्या मारनच्याच मालकीची आहे. काव्या मारन ही कलानिती मारन यांची एकूलती मुलगी आहे. त्यामुळे काव्या मारन कोट्यवधींची मालकीण आहे. (image credit-social media)
अभिनेता शाहरुख खानची नेटवर्थ जवळपास 6,000 कोटी रुपये आहे.मात्र काव्या मारनचे नेटवर्थ 24,000 कोटी रुपये असल्याने शाहरुख खानपेक्षा जवळपास काव्या मारन चौपट श्रीमंत आहे.(image credit-social media)