Weight Loss : वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर आहे ' हा ' उपाय
पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.तसेच कॅलरी जलद बर्न करते.पण वजन कमी करण्यासाठी किती पाणी पिणे आवश्यक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण वजन कमी करताना पाणी पिणे कसे महत्त्वाचे आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजन कमी करण्यासाठी पाणी पिणे फायदेशीर का आहे? पाणी प्यायल्याने शरीरातील घाण निघून जाते.त्यामुळे आजारांचा धोकाही कमी होतो.वजन कमी करण्यासाठी किती पाणी पिणे आवश्यक आहे,असा प्रश्न उपस्थित होतो.[Photo Credit : Pexel.com]
कोणी किती पाणी प्यावे हे प्रत्येक व्यक्तीच्या गरजांवर अवलंबून असते.शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे.[Photo Credit : Pexel.com]
वजन कमी करण्यासाठी पाणी कसे प्यावे: कोमट पाणी प्या: जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोमट पाणी रिकाम्या पोटी प्या आणि थंड पाणी नाही.[Photo Credit : Pexel.com]
यामुळे पोटातील उष्णता शांत होते आणि वजन कमी करणे देखील सोपे होते.त्याऐवजी तुम्ही साधे किंवा हलके पाणी पिऊ शकता.कोमट पाणी प्यायल्याने कॅलरीज बर्न होतात.[Photo Credit : Pexel.com]
पाणी थोडं थोडं प्या आणि एकाच वेळी खूप नाही : आयुर्वेदानुसार,एकावेळी भरपूर पाणी पिऊ नये असे प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन टिकून राहते. [Photo Credit : Pexel.com]
याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते त्यामुळे एकाच वेळी अनेक ग्लास पाणी पिऊ नये.भरपूर पाणी पिण्यापेक्षा थोडे थोडे पाणी प्यावे.[Photo Credit : Pexel.com]
खाण्याआधी पाणी प्या : जेवण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे.यामुळे तुम्ही जास्त कॅलरीज घेऊ शकत नाही आणि पचनक्रियाही वेगवान होते. [Photo Credit : Pexel.com]
एवढेच नाही तर बद्धकोष्ठतेचा धोकाही कमी राहतो.भूक नियंत्रणात राहते आणि तुम्ही जास्त खाणे टाळता.आयुर्वेदानुसार,जर तुम्ही जेवण करण्यापूर्वी पाणी पीत असाल तर जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटे पाणी प्या.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]