Best Way To Drink Water : पाणी उभे राहून प्यावे कि बसून हा प्रश्न पडलाय?उत्तर इथे मिळेल!
आयुर्वेदात असे म्हटले आहे की,उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये,त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि पोटाच्या समस्याही वाढू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही चालताना उभे राहून पाणी पीत असाल तर काळजी घ्या कारण या स्थितीत पाणी पिल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.जाणून घ्या पाणी पिण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आहे... [Photo Credit : Pexel.com]
पाणी पिण्याची योग्य पद्धत प्रत्येकाने ग्लासमध्ये घेऊन हळू हळू प्यावे योग्य मार्ग म्हणजे सिप करून पाणी पिणे.[Photo Credit : Pexel.com]
उभे राहून किंवा झोपून पाणी पिणे हानिकारक ठरू शकते.पाणी आरामात पिणे उत्तम आहे,याने शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पाणी पोहोचते आणि आपले काम योग्य प्रकारे करू शकते. [Photo Credit : Pexel.com]
उभे राहून पाणी पिण्याचे तोटे पुढीलप्रमाणे :उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो.फुफ्फुसात समस्या असू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
पचन समस्या असू शकतात.मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये. हे देखील उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम आहेत. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
ही सवय दीर्घकाळ राहिल्यास तुम्हीही गुडघ्याचे रुग्ण होऊ शकता. यामुळे सांधेदुखीसारखे वेदनादायक आजारही होऊ शकतात. या स्थितीत पाणी प्यायल्याने शरीर ताणतणावाखाली राहते आणि त्यातील द्रव संतुलनही बिघडते. [Photo Credit : Pexel.com]
जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पाणी शरीराच्या खालच्या भागात लवकर पोहोचते आणि पचनक्रिया बिघडू लागते म्हणून उभे राहून कधीही पाणी पिऊ नये आणि बसून पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]