Lifestyle : हवं तेव्हा हॉटेलमध्ये चेक-इन करा, पण चेकआऊट नेहमी 12 वाजता असतं. त्यामागचं लॉजिक तुम्हाला माहित आहे का?
शेवटी हा नियम करण्यामागे हॉटेलचा हेतू काय आहे, नसेल तर आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. जे थोडे इंटरेस्टिंग तसेच विचित्र आहे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुट्टीच्या प्लॅनिंगदरम्यान तुम्ही कधी ना कधी हॉटेल किंवा होमस्टे बुक केलं असेलच. तुम्ही कधी पाहिलं आहे का की हॉटेल्समध्ये चेक-इन वेळेबाबत कोणतेही नियम आणि कायदे नसतात, पण चेकआऊटची वेळ दुपारी 12 अशी निश्चित केली जाते. (Photo Credit : pexels )
सोप्या शब्दात सांगायचे तर लहान-मोठी हॉटेल्स तुम्हाला पूर्ण 24 तास भाडे आकारतात पण 24 तास खोली मिळत नाही. शेवटी यामागे हॉटेल्सचे लॉजिक काय? तुम्हीही या प्रश्नाचे उत्तर शोधत असाल तर आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.(Photo Credit : pexels )
हॉटेलमध्ये चेकआऊटची वेळ 12 वाजता ठेवण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोली, बेडशीट, कव्हर आणि इतर आवश्यक तयारीसाठी पूर्ण वेळ मिळतो. दुसरीकडे, ग्राहकांनी उशीरा चेकआऊट केल्यास या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अनेकदा ग्राहकही तक्रार करतात.(Photo Credit : pexels )
सुट्टीत लोकांना उठून आरामात तयार व्हायला आवडतं. त्यांची सोय लक्षात घेऊन चेकआऊटची वेळ सकाळी 9किंवा 10 नव्हे तर 12 वाजता ठेवली जाते. यामुळे ते आरामात तयार राहू शकतात आणि इतर पाहुण्यांना कोणतीही अडचण येत नाही.(Photo Credit : pexels )
हॉटेल्सही चेकआऊटची वेळ 12 वाजता ठेवतात कारण चेकआऊट ला उशीर झाला तर सर्व काही पटकन मॅनेज करण्यासाठी हॉटेल्समध्ये जास्त कर्मचारी असणे गरजेचे असते. संपूर्ण काम कोणत्याही एका कर्मचाऱ्यावर सोडता येणार नाही. ज्यामुळे त्यांचे बजेट वाढू शकते . (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )