Soaked Amla Benefits : बहुगुणी आवळा ! रोजच्या आहारात करा आवळ्याचा समावेश
आवळ्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर आवळा भिजवून खाण्यास सुरुवात करा.आवळा रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळा हे असे अन्न आहे ज्यामध्ये पोषक तत्वांचा साठा आहे. व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड्स आणि फायबर यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक त्यात मुबलक प्रमाणात आढळतात.
शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी हे सर्व पोषक तत्व आवश्यक असतात. आवळ्याचे सेवन प्रत्येक बाबतीत फायदेशीर आहे.
आवळा खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते. कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. या दोन्ही गोष्टी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेला आवळा खाल्ले तर तुम्ही अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव करू शकता.
आवळा खाल्ल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. कारण आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण असते ज्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. याशिवाय त्यात इतरही अनेक पोषक घटक असतात जे चयापचय वाढवतात. यामुळे शरीरात साठलेली चरबी जाळण्यास मदत होते.
कोणत्याही फळ किंवा भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असले तरी ती फळ भाजी पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असते. आवळ्यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. भिजवलेला आवळा रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि गोळा येणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
आवळा खाणे तुमच्या डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरू शकते. कारण त्यात व्हिटॅमिन ए असते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई आढळतात जे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
आवळा हा क्रोमियमचा उत्तम स्रोत आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय, उच्च रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते.