Orange Juice : लठ्ठपणा तसेच मधुमेहापासून दूर राहायचं असेल तर संत्र्याचा रस पिणं टाळा, 'हे' आहे कारण
संत्र्याचा रस आरोग्यासाठी फारसा चांगला नाही. मग तुम्ही ताजा रस असू द्या किंवा पॅकिंगमधील विकत घ्या. संत्र्याचा रस का पिऊ नये ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे लोक आहारात फळ आणि भाज्यांच्या रसाला अधिक प्राधान्य देतात. शरीरात झटपट ऊर्जा मिळावी आणि थंडावा मिळावा यासाठी थंडगार ज्यूस पिणं सर्वांना आवडतं. यामध्ये संत्र्याच्या रसाचाही आवडीच्या ज्यूसमध्ये समावेश होतो.
बाजारात उपलब्ध असलेल्या टेट्रापॅक ज्यूसपासून ते कोल्ड स्टोरेजमध्ये उपलब्ध असलेला संत्र्याचा रस नक्की पितो. संत्र्याचा रस व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्त्रोत आहे आणि यामुळे शरीराला थंडावा देण्यासोबतच रोगप्रतिकारशक्तीही वाढते असे आपल्या सर्वांना वाटते.
संत्र्यामुळे हे दोन्ही फायदे मिळतात हे खरं आहे. पण गुणवत्तेच्या बाबतीत संत्र्याचा रस संत्रं फळाहून अधिक काळ टिकू शकत नाही. म्हणजेच संत्र्याचा रस पिण्यापेक्षा संत्रं खाणं अधिक फायदेशीर आहे.
जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही संत्र्याच्या रसापासून दूर राहावं. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. तुम्ही बाजारातून संत्र्याचा कॅनबंद रस घ्या किंवा ज्यूस कॉर्नरमधून घ्या, हा रस तयार करताना भरपूर साखर मिसळली जाते, ही अतिरिक्त कॅलरीजच्या रूपात शरीरात साठते. जर तुम्ही रोज एक ग्लास संत्र्याचा रस प्यायलात तर एका वर्षात शरीराला सुमारे 14 किलो साखर फक्त संत्र्याच्या रसातून मिळेल.
संत्र्याचा रस चरबी वाढवतो कारण यामध्ये भरपूर साखर असते. तसेच ज्यूस प्यायल्यावर आपण पटापट पितो आणि त्यानंतर किमान एक ग्लास तरी पितो. जेव्हा भरपूर साखर शरीरात जाते, तेव्हा शरीर एकाच वेळी एवढी साखर वापरू शकत नाही, म्हणून तिचे चरबीमध्ये रूपांतर करते आणि साठवते. यामुळे तुमचे वजन नक्कीच वाढेल.
दररोज संत्र्याचा रस पिणाऱ्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो. हा ज्यूस रोज प्यायल्याने जास्त प्रमाणात साखर शरीरात जाते, त्यामुळे किडनीशी संबंधित आजाराचा धोकाही वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.