Nita Ambani Nosepin Collection: नथीचा नखरा... नीता अंबानींच्या स्टायलिश नथींचं कलेक्शन पाहा
Nita Ambani Nosepin Collection: जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत समाविष्ट होणारं भारतीय नाव म्हणजे, मुकेश अंबानी. अंबानी कुटुंबीयांचा थाटच वेगळा. मग तो त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा लग्नसोहळा असो वा एखादी पार्टी. अंबानी कुटुंबीय आणि त्यांची लाईफस्टाईल यांच्या चर्चा नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. अशातच मुंकेश अंबानींसोबतच त्यांच्या पत्नी नीता अंबानीही नेहमीच आपल्या लाईफस्टाईल अन् क्लासी लूक्समुळे चर्चेत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनीता अंबानींचे लूक्स आणि त्यांच्या लाईफस्टाईलची चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. अशातच त्यांचं ज्वेलरी कलेक्शनची बात काही औरच...
मॉर्डन टच असलेल्या ज्वेलरीसोबतच त्यांचं एथनिक ज्वेलरी कलेक्शन सर्वांचं लक्ष वेधून घेतं.
पण जर त्यांच्या खास ज्वेलरी कलेक्शनबाबत बोलायचं झालं तर, ती म्हणजे नथ. इत दागिन्यांसोबतच नीता अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये क्लासी अन् एथनिक टच असलेल्या नथींचा समावेश आहे.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी उद्योगजगतात स्वतःचंही वेगळं अस्तित्व निर्णाण केलं आहे. सर्व मोठ्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह, नीता अंबानींचा आवडता दागिना म्हणजे, त्यांची नथ. पुढील स्लाइड्समध्ये, आम्ही तुम्हाला नीता अंबानी यांच्या हिऱ्याच्या नथींच्या अनोख्या कलेक्शनची काही फोटो दाखवणार आहोत.
मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाच्या एका फंक्शनमध्ये नीता अंबानी यांनी ग्रीन एमरेल्ड सेट वेअर केला होता आणि त्यासोबत मॅचिंग नोज रिंगही घातली होती. ही नथ खरंच फार सुंदर दिसत होती.
नीता अंबानी यांच्या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये एक अतिशय सुंदर सोन्याची नथही आहे, या नथीत मोठमोठे हिरे जडवले आहेत.
या फोटोमध्ये नीता अंबानी यांनी कुंदन नथ वेअर केली आहे. हे कुंदन सोन्यात जडले आहेत. नीता अंबानी खास फंक्शनसाठी आपला लूक पूर्ण करताना नथ वेअर करतात.
नथीची फॅशन जुनी असली तरी ती रिक्रिएट करून नीता अंबानी यांनी एक नवा ट्रेंड सेट केला आहे. नीता अंबानी यांचा हा फोटो मुलगा आकाशच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनमधला आहे. नीता यांची ही नथ प्लॅटिनमची असून त्यात हिरा जडवण्यात आलेला आहे.
नीता अंबानी यांच्या कलेक्शनमध्ये मोत्यांच्या हाराचाही समावेश आहे. मुलगी ईशा अंबानीच्या लग्नात नीता अंबानी यांनी हा सुंदर मोती आणि डायमंड कॉम्बिनेशनचा हार घातला होता. त्यासोबतच, मोत्याची नथही त्यांनी वेअर केली होती.