Kitchen Tips: मिक्सरमध्ये 2 मिनिटांत पीठ मळण्याची सोपी ट्रिक; पाहा 'हा' अनोखा पर्याय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jul 2023 04:38 PM (IST)

1
मऊ चपात्या बनवायच्या असतील तर योग्य पद्धतीने पीठ मळणं गरजेचं असतं, पण अनेकदा आपल्याला पीठ मळण्याचा कंटाळा येतो. तर आज आपण मिक्सरच्या सहाय्याने अगदी काही मिनिटांत पीठ कसं मळायचं? हे पाहणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
यासाठी प्रथम मिक्सरचं भांडं घ्यावं आणि त्यात गव्हाचं पीठ ओतून घ्यावं.

3
यानंतर गव्हाच्या पिठात थोडं मीठ टाकावं.
4
गरजेनुसार पाणी आणि तेल टाकून मिक्सरचं झाकण लावून मिक्सर सुरू करावा.
5
प्रथम मिक्सर हळूहळू फिरवून घ्या, सुरुवातीलाच एकदम वेगाने फिरवू नये.
6
आता मिक्सरच्या भांड्यात हळूहळू पिठाचा गोळा तयार होताना दिसेल. गरज असल्यास यात तुम्ही पाणी घालू शकतात.
7
त्यानंतर तयार झालेला पिठाचा गोळा काढून घ्यावा.
8
पिठाचे छोटे छोटे गोळे करुन चपात्या लाटून घ्याव्या.