Mustard Seeds Benefits : मोहरीचे दाणे आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही गुणकारी; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
मोहरीचे दाणे, पोषक तत्वांनी समृद्ध, पदार्थांमध्ये वापरल्या जाणार्या खास मसाल्यांपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवणाची चव वाढवण्याबरोबरच हे मोहरीचे दाणे तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.
लोह, कॅल्शियम, सेलेनियम, फॉस्फरस आणि इतर अनेक पोषक तत्वे मोहरीमध्ये आढळतात.
मोहरीचे तेल साधारणपणे प्रत्येक स्वयंपाकघरात वापरले जाते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते.
मोहरीच्या दाण्यांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे शरीरातील वेदना आणि तणावापासून आराम देते. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर मोहरी खूप फायदेशीर ठरू शकते.
मोहरीचे दाणे पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर असतात. ज्यांना अपचनाची समस्या आहे त्यांच्यासाठी मोहरी रामबाण उपाय आहे. या बियांमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते, त्यामुळे पचनशक्ती वाढते.
मोहरीच्या दाणे हाडे मजबूत करण्यास देखील मदत करतात. त्यात सेलेनियम नावाचे खनिज असते, जे तुमची हाडे मजबूत करते.
बदलत्या ऋतूंमध्ये त्वचेच्या समस्या सामान्य असतात. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या दिनचर्येत मोहरीचा समावेश करू शकता. हे त्वचेला हायड्रेट करते आणि मुरुमांवर नियंत्रण ठेवते. या बियांमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म सूज कमी करू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.