Hair Care Tips : पांढऱ्या केसांपासून सुटका हवी ? तर करा हे आयुर्वेदिक उपाय
आजकालच्या काळात, केस ( अकाली पांढरे होणे ही समस्या अगदी सामान्य झाली आहे. केस पांढरे होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही. कारण आता सर्व वयोगटातील लोक या समस्येला बळी पडत आहेत. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी हार्मोनल बदलांमुळे तर कधी पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होतात. (Photo Credit : unsplash)
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. आवळा आरोग्यासाठी तसेच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून हेअर पॅक म्हणून वापरता येते. (Photo Credit : unsplash)
भृंगराज तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. भृंगराजमध्ये असलेली हरितकी केसांसाठी वरदान आहे. (Photo Credit : unsplash)
भृंगराज तेल केस काळे तर ठेवतेच पण ते निरोगीही ठेवते. भृंगराज तेल इतर तेलात मिसळून लावावे. तुम्ही एरंडेल तेलात मिसळून लावल्यास जास्त फायदा होतो. याबरोबरच भृंगराज पावडर हेअर पॅक म्हणूनही वापरता येते. (Photo Credit : unsplash)
आठवड्यातून एकदा भृंगराज पावडर हेअर पॅक केसांवर अर्धा तास लावल्यास फायदा होईल.
कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना निरोगी तर बनवतेच शिवाय त्यांना नैसर्गिक शाईनही देते. यासाठी कांद्याचा रस काढून कापसाच्या मदतीने टाळूवर लावा. हलक्या हातांनी मसाज केल्यानंतर काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.(Photo Credit : unsplash)
यासाठी अर्ध्या वाटी खोबरेल तेलात दोन चमचे आवळा पावडर मिसळून पेस्ट बनवा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी ही पेस्ट टाळूवर आणि केसांना लावा. दोन तासांनंतर शॅम्पू करा.(Photo Credit : unsplash)