Best Tvel Pces In Aodhya : तुम्ही पण जाताय अयोध्येला? मग या सुंदर हिल स्टेशनलाही भेट द्या
जानेवारी 2024 चा महिना अयोध्येच्या ऐतिहासिक पानांमध्ये नोंदवला जाणार आहे. कारण अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.(Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App22 जानेवारी 2024 रोजी राममंदिरात रामललाच्या प्राणप्रतीष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्तांव्यतिरिक्त इतर धर्माचे लोकही येणार आहेत. (Photo Credit : unsplash)
पण, तुम्हाला आयोध्येतील सर्वोत्तम हिल स्टेशन माहित आहेत का? जाणून घ्या आयोध्येतील सर्वात सुंदर आणि आकर्षक हिल स्टेशन बद्दल(Photo Credit : unsplash)
पोखराची सुंदरता एवढी प्रसिध आहे की, इथे फक्त भारतीय पर्यक नाही तर विदेशी पर्यटक देखील येथील सौंदर्याचा आनंद घेतात. (Photo Credit : unsplash)
हे सुंदर शहर अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य, मोहक तलाव, पर्वत शिखरे आणि शांत वातावरणासाठी संपूर्ण नेपाळमध्ये प्रसिद्ध आहे. अयोध्या ते पोखरा हे अंतर सुमारे 352 किमी आहे.(Photo Credit : unsplash)
उत्तराखंडच्या सुंदर खोऱ्यांमध्ये वसलेले नैनिताल हे स्वर्गापेक्षा कमी नाही. असे म्हण्यास हरकत नाही. हे उत्तराखंडचे असे एक हिल स्टेशन आहे, जिथे बहुतेक पर्यटक फिरायला आणि मजा करायला येतात. (Photo Credit : unsplash)
उंच टेकड्यांचे सौंदर्य, मनमोहक तलाव-धबधबे, देवदाराची झाडे आणि हिरवी गवताची मैदाने नैनितालच्या सौंदर्यात भर घालतात. (Photo Credit : unsplash)
नैनितालमध्ये तुम्ही नैनी तलाव, नैना देवी मंदिर, केव्ह गार्डन सारख्या ठिकाणांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तसेच ट्रेकिंगसोबतच, नैनितालमध्ये तुम्ही पॅराग्लायडिंगचाही आनंद घेऊ शकता. ते अयोध्येपासून ५३२ किमी अंतरावर आहे.(Photo Credit : unsplash)
समुद्रसपाटीपासून 208 मीटर उंचीवर वसलेले भरतपूर हे एक सुंदर शहर आहे.हे नेपाळचे एक आकर्षक हिल स्टेशन देखील आहे. हे सुंदर शहर चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. (Photo Credit : unsplash
भरतपूर हे काठमांडू आणि पोखरा नंतर नेपाळमधील तिसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. भरतपूर आपल्या सौंदर्यासोबतच आदरातिथ्यासाठी देखील ओळखले जाते. शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चितवन राष्ट्रीय उद्यानात तुम्ही सर्वोत्तम जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. ते अयोध्येपासून फक्त 306 किमी अंतरावर आहे.(Photo Credit : unsplash)