US: लास वेगासच्या नाईट लाईफबद्दल तुम्ही बरंच ऐकलं असेल! तेथील रात्रीचं नेमकं वातावरण पाहा
जेव्हा तुम्ही लास वेगासचं नाव ऐकलं असेल तेव्हा तिकडच्या नाईटलाईफबद्दल ऐकलंच असेल. बरेच लोक रात्रीच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी येथे जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकसिनो, लक्झरी हॉटेल्स, झक्कास नाईटलाइफमुळे लास वेगासला पसंती दिली जाते. अमेरिकेतील या शहरात मोठ्या संख्येने कसिनो, क्लब, पार्टीची ठिकाणं आहेत, त्यामुळे येथे दिवसापेक्षा रात्र अधिक गजबजलेली असते.
ज्यांना पार्टी करायला आवडते त्यांच्यासाठी लास वेगास हे एक खास ठिकाण आहे.
येथे अनेक प्रकारचे नाईट क्लब आहेत आणि तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणत्याही क्लबमध्ये जाऊ शकता.
नाईट क्लबमधील स्ट्रिप डान्समुळेही शहर चर्चेत असते आणि लोक या नृत्यांचा आनंद घेण्यासाठी येथे जातात.
स्पा, कसिनो, लक्झरी बार इत्यादींमुळे इथली हॉटेल्सही खास आहेत आणि या सुविधा अनेक हॉटेल्समध्ये उपलब्ध आहेत.
सुंदर तरुणींनी गजबजलेल्या या शहरात नाईटलाईफची मज्जाच वेगळी असते.