Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kojagiri Purnima 2022 : कोजागरी पौर्णिमा आणि खीर बनविण्याची परंपरा; वाचा महत्त्व
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा (Kojagari Purnima 2022) म्हणतात. कोजागरी पौर्णिमेलाच काही ठिकाणी कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) तर काही लोक कोजागर पौर्णिमा (Kojagar Purnima) असे म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोजागरी पौर्णिमा शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. या दिवशी कोजागरी पौर्णिमा 9 ऑक्टोबर (उद्या) रोजी साजरी केली जाणार आहे.
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. विशेष म्हणजे खीर बनविण्याची अनोखी परंपरा आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसामसह देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये कोजागरी पूजा विधी करत साजरी केली जाते. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मध्यरात्री पूजा केली जाते.
हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते. आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.
अश्विन पौर्णिमा सुरू होते : 03.41 AM (09 ऑक्टोबर 2022, रविवार) अश्विन पौर्णिमा संपेल : 02.25 AM (10 ऑक्टोबर 2022, सोमवार)
शरद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करण्याची परंपरा आहे. सर्वप्रथम लक्ष्मी देवीसमोर धूप-दीप लावला जातो. त्यानंतर सुगंध, सुपारी. पान, अक्षता, फुले इत्यादी अर्पण केले जाते. रात्रीच्या सुमारास खीर बनवली जाते. अनेक ठिकाणी मध्यरात्री देवी लक्ष्मीला खीर अर्पण केली जाते. शिवाय चंद्राच्या प्रकाशात खीर भरलेले भांडे ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी त्याच भांड्यातील प्रसाद घरातील सदस्यांसह इतरांना वाटली जाते.
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्णावस्थेत असतो, पावसाळ्यानंतर आकाशही स्वच्छ असते. आख्यायिकेनुसार रात्री तांदूळ-दुधाची खीर धातूच्या भांड्यात (तांबे किंवा पितळ नव्हे) ठेवून स्वच्छ कापडाने बांधून मोकळ्या आकाशात ठेवली जाते. चंद्राच्या प्रकाशात ठेवल्यानंतर ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार, दुधामध्ये लैक्टिक अॅसिड असते, जे चंद्राच्या स्वच्छ किरणांपासून जंतूनाशक शक्ती प्रदान करते. यामुळे दमा, त्वचा रोग आणि श्वसनाच्या आजारात विशेष फायदा होतो, असे सांगितले जाते.