Dhanteras Diwali 2022 : सुख-समृद्धीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' 7 गोष्टी घरी आणा; लाभ होईल
दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच दिवाळीला सुरुवात होते. या वेळी धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनत्रयोदशीच्या दिवशी बहुतेक लोक सोने, चांदी आणि भांडी खरेदी करतात. या वस्तूंशिवाय इतरही काही गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणणे म्हणजे एक प्रकारचा लक्ष्मीचा आशीर्वादच आहे असे मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. तुम्ही सोन्याच्या खरेदीऐवजी पितळेची एखादी वस्तू जरी खरेदी केली तरी चालेल. धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीच्या दिवशी 11 गोमेद चक्र खरेदी करून आणावीत. दिवाळीच्या दिवशी या गोमेद चक्रांची पूजा करा आणि त्यानंतर त्यांना पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की, यामुळे घरात समृद्धी येते आणि घरातील लोक निरोगी राहतात.
झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे आवश्यक आहे. असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने गरिबी दूर होते आणि घरात सुख-समृद्धी येते.
अक्षता म्हणजेच तांदूळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी अक्षता घरात आणाव्यात. यामुळे लक्ष्मीची कृपा राहते आणि संपत्तीही वाढते.
लक्ष्मीला श्री यंत्र अत्यंत प्रिय आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी श्री यंत्र घरात आणा आणि दीपावलीच्या दिवशी त्याची पूजा करा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते.
धनत्रयोदशीच्या दिवशी कोथिंबीर खरेदी केल्यानंतर ती दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीला अर्पण करावी. यापैकी काही बिया घराच्या बागेत पेराव्यात. यापासून वाढणारी कोथिंबीर घरात सुख-समृद्धी निर्माण करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.