Benefits Of Ice Bath : Ice Bath चे आरोग्याला होणारे भन्नाट फायदे, शरीराचा त्रासही होतो कमी
दररोज आंघोळ करणे हे निरोगी शरीरासाठी चांगले आहे असे म्हणता येईल, परंतु तुम्ही कधी आईस बाथ घेतला आहे का? आईस बाथ घेणे म्हणजे पाण्यात बर्फ घालून अंघोळ करणे. आईस बाथ घेण्याचे अनेक फायदे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआईस बाथ वेळी एखादी व्यक्ती बर्फाच्या पाण्यात बसते आणि अंघोळ करते. हा आईस बाथ साधारणपणे 10 मिनिटे घ्यावा लागतो.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आईस बाथ घेतल्याने स्नायू दुखणे, सांधेदुखी यापासून आराम मिळतो. विशेषत: जे लोक खेळांमध्ये सक्रिय असतात, किंवा बॉडी बिल्डर्स इ. त्यांच्या स्नायूंच्या वेदना कमी करण्याकरता आईस बाथ उपयोगी पडतो.
जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा निद्रानाश होत असेल तर आईस बाथ केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. जे लोक तणावाचा सामना करत आहेत त्यांच्याकरता देखील हा बाथ फायदेशीर आहे. आईस बाथ केल्याने कमकुवत पचनशक्ती मजबूत होते आणि शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढते.
बर्फाने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान अगदी सामान्य राहते. जेव्हा शरीराचे तापमान शरीरासाठी योग्य नसते, तेव्हा तुम्ही आईस बाथ घ्या.
तर आईस बाथ घेतल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तसेच श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.
थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने एड्रेनालाईन, एपिनेफ्रिन आणि नॉरड्रेनालाईन सारखे हार्मोन्स बाहेर पडतात, जे मूड सुधारतात. बर्फाच्या आंघोळीनंतर एक सुखद अनुभव येतो, परंतु या काळात एखाद्याला खूप वेदना सहन कराव्या लागू शकतात.
अनेकदा आपल्याला काही खावेसे वाटत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही बर्फाच्या पाण्याने अंघोळ करता तेव्हा तुमची भूक नैसर्गिकरित्या वाढते.
उष्णतेमुळे घामाद्वारे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाणी आणि मीठ बाहेर टाकले जाते. अशा परिस्थितीत आईस बाथ घेतला तर त्वचेला लवकर आराम मिळतो आणि सुरकुत्या कमी होतात.
बर्फाच्या पाण्याचे तापमान 10-15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नसावे. 10 मिनिटांपेक्षा जास्त पाण्यात राहू नका.