Ridge Gourd Benefits: दोडका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास ठरतो उपयुक्त
दोडका ही एक फळभाजी आहे. यात व्हिटॅमिन सी, ए, बी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. त्याचे सेवन रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबत वजन नियंत्रित करण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोडका म्हणले की , घरातील मोठे लहान सगळेजण तोंड मुरडतात. कारण अशा भाज्या खाणे त्यांना आवडत नाही. परंतु ही भाजी अतिशय हलकी, पचायला सोपी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या नियमित आहारात या भाजीचा समावेश केला तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.
दोडक्यात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच हृदयविकाराचा झटका आणि हृदया संबंधित समस्या कमी करते.
दररोजच्या आहारात दोडक्याचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे. पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध असलेला दोडका रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढविण्यात मदत करते.
दोडक्यामध्ये पेप्टाइड आणि एल्कलॉइड घटक आढळतात. ते मेटाबॉलिजम वाढविण्यात मदत करतात. दोडक्याचे सेवन केल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत होते. म्हणूनच, मधुमेह रूग्णांनी आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.
दोडक्यामध्ये कमी कॅलरी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते अशाप्रकारे, वजन वाढण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो.
व्हिटॅमिन ए, बी, सी आणि इतर पौष्टिक द्रव्याने समृद्ध दोडका डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतो. याच्या सेवनाने डोळ्यांची दृष्टी वाढते आणि त्या संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
सतत पाय दुखणे, पोट फुगणे, सतत काम केल्याने थकवा येणे. या विकारांमध्ये दोडक्याच्या फोडी किंवा भाजी खाल्ल्यास अथवा दोडक्याचा रस पिल्यास या विकारांपासून सुटका मिळते.
जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ असेल तर तुम्ही नक्कीच दोडक्याची भाजी खाल्ली पाहिजे. ही भाजी खाल्ल्याने शरीरातली घाण सहजपणे दूर होते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, डाग या समस्या नाहीशा होतात.
आजकाल बद्धकोष्ठता आणि डिहायड्रेशनची सामान्य समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. कफ आणि पित्त देखील दोडका खाल्याने कमी होते.